फटाके उडवताना एक जण गंभीर जखमी sakal
अकोला

अकोला : फटाके उडवताना एक जण गंभीर जखमी

तीन ते चार जणांना फटाके उडवताना दुखापत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : दिवाळीच्या उत्साहात फटाके उडवताना एका युवकाच्या डोळ्याजवळ फटाक्याची ठिणगी उडाल्याने तो गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी (ता. ४) घडली. सदर युवकाला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याच्या डोळ्याच्या बुब्बुळाला मोठी दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णाला तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.

याव्यतिरिक्त गत तीन ते चार दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात फटाक्यांमुळे भाजल्या गेल्यामुळे तीन ते चार जणांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील डॉ. गुरुदासाणी यांनी दिली. दिवाळी हा देशातला सर्वात मोठा सण आहे. कोविडमुळे गेल्या वर्षी निर्माण झालेला ताण यंदा कमी झाल्याने यावर्षी सर्वजन दिवाळी उत्साहात व धडाक्यात साजरी करत आहेत.

दिवाळीच्या पूर्वीच ग्राहकांनी बाजारातून फटाक्यांची खरेदी केली. त्यासोबत गत तीन चे चार दिवसांपासून फटाके उडवण्यास सुरुवात सुद्धा केली आहे. परंतु फटाके उडवताना काळजी न घेतल्याने या आठवड्यात तीन ते चार रुग्णांना फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे सौम्य व तीव्र स्वरूपाची इजा झाल्याने ते महानगरातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पोहचले.

त्यापैकी एका रुग्णाच्या बुब्बुळाजवळच फटाक्याची ठिगणी उडाल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्याच्या घरच्यांनी त्याला सर्वोपचार रुग्णालयात आणले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु दुखापत अधिक असल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

SCROLL FOR NEXT