Akola engineering students agitation Demand for speedbreaker  sakal
अकोला

अकोला : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

विद्यार्थ्यांचा रास्ता रोको; ठिकठिकाणी ‘स्पीडब्रेकर’ लावण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बाभुळगाव जवळ असलेल्या श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रणय इंगळे याचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर गुरुवारी महाविद्यालयातील मुला-मुलींनी संतप्त होत महामार्गावर रास्ता रोको केले. बोरगाव मंजूकडून येणाऱ्या आणि बाबुळगाव ते महाविद्यालय रस्त्यावर ठिकठिकाणी स्पीडब्रेकर टाकण्याची मागणी त्यांनी केली.

राष्ट्रीय महामार्गावर अभियांत्रिका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रणय रवींद्र इंगळे (२१, राहणार, निपाणा, ता.अकोला) हा बुधवारी दुचाकीने महाविद्यालयात जात असताना महाविद्यालयाजवळ त्याच्या गाडीला सीजी ०४ एमएम २२१० या क्रमांकाच्या टँकरने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी प्रणयला महाविद्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करीत ठिकठिकाणी स्पीडब्रेकर लावण्याची मागणी केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले विद्यार्थ्यांची समजूत केली. तेव्हा कुठे विद्यार्थी मागे हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Marathi News Live Updates: ९० दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात परतीच्या पावसाची हजेरी, पहाटेपासून शहरात पावसाची संततधार

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT