crime
crime  Sakal
अकोला

अकोला : गोवंश तस्करांचा बजरंग दल कार्यकर्त्यांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाला पोलिसांसोबत ताब्यात घेऊन हिवरखेड पोलिस स्टेशनकडे नेत असताना सोनावडी फाट्याजवळ गोवंश तस्करांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसासमक्ष हल्ला चढवून त्यातील ३६ गोवंश पळविल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत ता. ९ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. हल्ल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत बेलखेड, तळेगाव बाजार, हिवरखेड व अडगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करून मांस विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. या गावात कत्तलीकरिता गोवंश हे सातपुडा पर्वतमधील ‘झरी’ गेट मार्गे मोठ्या प्रमाणात आणल्या जातात. यापूर्वी हिवरखेड पोलिस अंतर्गत २० बोलेरो गाड्यांमध्ये निर्दयतेने कोंबून आणलेले गोवंश पोलिसांनी गाड्यासह जप्त केले होते. अडगाव, बेलखेड व तळेगाव बाजार या ठिकाणी गोवंश कत्तली केलेल्या अवस्थेत पोलिसांनी जप्त करून कारवाई केली होती. ता.९ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दानापूर परिसरातून गोवंश तस्कर ४० गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती सोगोडा वारखेड व दानापूर येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.

त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच तीन पोलिस कर्माचारी घटनास्थळी पोहचले. गोवंशाच्या तुलनेत पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना गोवंश पोलिस स्टेशनला नेण्याकरिता मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोवंश हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये नेण्यासाठी सोबत जाण्याची मदत केली. गोवंश पोलिस स्टेशनला नेत असतानाच सोनवाडी फाट्यानाजीक गोवंश तस्करांनी अचानक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढविला आणि पोलिसासमक्ष मारहाण करून पकडलेल्या गोवंशापैकी ३६ गोवंश पळविण्यात यशस्वी झाले.

उर्वरित चार गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहीपर्यंत कोणत्याच इसमाने पोलिसांमध्ये तक्रार दिली नव्हती आणि हिवरखेड पोलिसात कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतु, स्वतः पोलिसांतर्फे घटनेची फिर्याद दिली जाईल अशी माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ रितू खोकर व त्यांचा ताफा तेल्हाराचे ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांचा ताफा हिवरखेड येथे दाखल झाले.

हिवरखेड ठरत आहे गोवंश तस्करीची राजधानी

गत काही वर्षात हिवरखेड रुपराव हे स्थळ मध्य प्रदेशातून महाराष्ट्रासह आंतरराज्यीय स्तरावर गोवंशाच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही या परिसरातून सर्रास गोवंश तस्करी चालते आणि मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल सुद्धा होते. अनेकदा कारवाया झाल्या परंतु, गोवंशाची कत्तल आणि तस्करीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले नाही. गोवंशाची कत्तल आणि तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची परिसरात चर्चा आहे. संबंधित यंत्रणेकडून अभय मिळत असल्यामुळे तस्करांचे मनोबल वाढले असल्याचे बोलले जाते. जोपर्यंत झरी गेट येथे पोलिस चौकी स्थापित होत नाही तोपर्यंत गोवंशाच्या तस्करीला आळा बसणे शक्य नसल्याचेही अनेकांचे मत आहे.

प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेला हल्ल्याचे प्रकरण दाबण्यासाठी गावातील राजकीय व्यक्तींकडून दबावाचा वापर होत असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे हिवरखेड परिसरासह तालुक्यात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या समक्ष गोवंश तस्कर मारहाण्याची हिम्मत काशी करू शकतात? याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी युव पोलिसांनी गोवंशांना पोलिस ठाण्यात नेणार असल्याचे सांगीतल्यावरून गोवंश तस्कर व पोलिसांत वाद वाढत गेला आणि वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. त्यामध्ये तस्करांनी गोरक्षकांसोबतच पोलिसांवर सुद्धा हात उगारल्याचे बोलले जात आहे. हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची चर्चा असून, काही जखमींना अकोला येथे रेफर केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने एका जमावाने त्याचा फायदा घेत प्रचंड दादागिरी केली आणि पोलिसांच्या ताब्यातील ४० गोवंशापैंकी ३६ गोवंश घेऊन पसार झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

Khambatki Ghat : भररस्त्यात बस बंद पडल्याने पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT