Palak Tiwari sakal
अकोला

Akola News : रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीने मुलीच्या अंत्यसंस्कारात व्यत्यय; पोलिसांनी थांबविले अंत्यसंस्कार

रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे शुक्रवारी एका 14 वर्षीय युतीच्या अंत्यसंस्कारात आला व्यत्यय. अग्नी दिल्यानंतरही पोलिसांनी अंतिम संस्कार थांबविले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे शुक्रवारी एका 14 वर्षीय युवतीच्या अंत्यसंस्कारात व्यत्यय आला. अग्नी दिल्यानंतरही पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबविले. मात्र, नंतर पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर सर्व सोपस्कार पार पाडून तीन तासानंतर उमरी स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करण्यात आले.

अकोला येथील ऑर्बिट हॉस्पिटल येथे गुरुवारी 14 वर्षीय पलक धीरेंद्र तिवारी हिला गंभीर आजारी स्वरूपात दाखल करण्यात आले होते. शिकवणी वर्गातून घरी परत आल्यानंतर डोकं दुखत असल्याचे पालकांना सांगितल्यामुळे तिला तातडीने ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पालकांकडून उपचाराचे सर्व शुल्क वसूल करून मृतदेह पालकांच्या स्वाधीन केला. मात्र, मृत्यू प्रमाणपत्र दिले नाही. तसेच पोलिसांना पाठविण्यात येणाऱ्या अहवालात विलंब केला.

त्यामुळे उमरी स्मशानभूमीत पलकच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करीत जळत असलेल्या चितेवर पाणी टाकून अंतिम संस्कार थांबविले. हॉस्पिटल प्रशासनाने कोणताही अहवाल दिला नसल्याचे सांगून अंत्यसंस्कार थांबवल्यामुळे काही काळासाठी वातावरण तापले होते.

त्यानंतर पोलिसांनीच सामंजस्याची भूमिका घेत हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून पुढील सर्व सोपस्कार पार पाडले व पीएमसाठी आवश्यक प्रक्रियाही स्मशानभूमीतच पूर्ण केली. त्यानंतर पलकच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र ऑर्बिटर हॉस्पिटल प्रशासनाच्या चुकीमुळे तिवारी परिवाराला दुःखात असताना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

याबाबत कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांच्या वर्तणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात चुकीची माहिती दिल्याचा आरोपही मृतकाच्या पालकांनी केला आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासनासोबत संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT