akola lok sabha election who get more votes know here
akola lok sabha election who get more votes know here  Sakal
अकोला

Akola Lok Sabha Election : कुणाला मिळणार पसंती? भाऊ, दादा की बाळासाहेब

योगेश फरपट

अकोला : अखेर मतदानाचा दिवस उजाडला. आज अकोला लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान घेण्यात येत आहे. लोकशाहीच्या उत्सवात मतदान करून प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी मतदाराजा उतावीळ झाला आहे.

एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत ही महायुतीचे अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणूकीत कोण बाजी मारेल याची चर्चा रंगत असताना ‘भाऊ, दादा की बाळासाहेब’ यापैकी आज कुणाच्या नावासमोरील बटण दाबून पसंती मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकशाहीच्या महोत्सवासाठी प्रशासनासह उमेदवार व मतदारांनाही उत्कंठा लागली आहे. आज २६ एप्रिलरोजी दुसऱ्या टप्‍प्यातील अकोला लोकसभा निवडणूकीसाठी मतदान घेण्यात येत आहे. मागील (२०१४) ६० टक्के मतदान झाले होते. ही मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह शासन,प्रशासनातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जात आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पूर्व, पश्चिम, अकोट, मुर्तिजापूर व वाशीम जिल्हयातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश होते. यामध्ये १८ लाख ९९ हजार ८१४ मतदार आहेत. यापैकी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रोत्साहित केले जात आहे.

सलग पाचव्यांदा सत्तेचा गड काबिज करण्यात अनुप धोत्रे (भाऊ) यशस्वी ठरतात की बहुमताचा कौल असणारे डॉ. अभय पाटील (दादा) बाजी मारतात की ॲड. प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब) यांना मतदारांची साथ लाभते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  • एकूण मतदारसंख्या - १८,९०,८१४

  • एकूण मतदान केंद्र - २,०५६

  • एकूण उमेदवार - १५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT