Akola Marathi News Take away the problems in cotton grading - Shetkari Jagar Manch 
अकोला

कापूस ग्रेडिंगमधील अडचणी दूर करा- शेतकरी जागर मंच

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कापूस खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये होणाऱ्या अडचणी दूर करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी एका निवेदनाद्वारे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.

कापूस खरेदीत होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईस आळा घालण्याकरिता कापूस खरेदी केंद्र सीसीआय, कॉटन फेडरेशन येथे कापसाची हमी किंमत ५८५० रुपये असून, ती सीसीआय व फेडरेशनद्वारे शेतकऱ्यांना ५६१५ रुपये किंवा ५५२५ रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल नुकसान होत असून, कापूस गाडी व ट्रॅक्टर मोजण्याकरिता दोन ते तीन दिवस लागत आहेत. याकरिता अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले जावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे व शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर! Uber अ‍ॅपवरून थेट तिकीट बुकिंग होणार; 50% सूटही मिळणार, पण कुठे?

Navi Mumbai: नवी मुंबईचे पाणी दर वाढणार? नवा दर लागू करण्याचा पालिकेचा प्रस्ताव

Jalgaon News : जळगावात ७५ कोटींचा 'केळी' घोटाळा! लागवड नसतानाही लाटला विमा; ४२ सीएससी चालकांवर गुन्हे

SCROLL FOR NEXT