Akola market committee presented wrong information
Akola market committee presented wrong information sakal
अकोला

अकाेला : बाजार समितीने सादर केली 'खोटी माहिती'

सकाळ वृत्तसेवा

अकोट : शेतकरी पॅनलच्या शिष्टमंडळाच्या वतीने बाजार समिती सचिवांना मुद्दे निहायक माहिती मागवण्यात आली होती. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने मुख्य प्रशासकांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन गरजेपुरत्या काही प्रश्नांना थातूरमातूर उत्तरे देऊन पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रशासक मंडळाने शेतकरी पॅनलला दिलेल्या माहितीवरून माजी आमदार संजय गावंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन बाजार समिती प्रशासनाकडून दिशाभूल करणारी खोटी माहिती व आकडेवारी देऊन घणाघाती आरोप बाजार समिती प्रशासनावर केला आहे.

यासंदर्भात बोलताना माजी आमदार संजय गावंडे म्हणाले की, बाजार समितीने पाठवलेल्या खुलाशाचे संपूर्ण अवलोकन केले असता, बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याची माहिती सर्व दस्तऐवजांसह त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकरी पॅनलचे संजय गावंडे, डॉ.प्रमोद चोरे, डॉ. गजानन महल्ले, प्रदीप वानखडे यांनी केली आहे. बाजार समितीकडून देण्यात आलेल्या माहितीवरून शेतकरी पॅनलने प्रशासकांच्या कामकाजावर ताशेरे ओढल्याने आता जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. यापुढे कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ऑडिट न होण्यास प्रशासन जबाबदार

लेखापरीक्षकास लेखा परीक्षणासाठी आवश्यक ते दस्तावेज प्रश्न उपस्थित करेपर्यंत पोहोचवली नाही. त्यामुळे लेखापरीक्षण वेळेवर झाले नाही. २०२०-२१ चे ऑडिट न होण्यासाठी नियम ११६ (३) नुसार प्रशासनच जबाबदार असल्याचेही गावंडे यांनी यावेळी सांगीतले.

नोकर भरतीत अनियमितता

भरती प्रक्रियेत शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले नाही. बाजार समितीत नियमबाह्य नियुक्ती देण्यात आली. रोखपाल हे पद फक्त कायम कर्मचारीकडे असते, तो रोजंदारी कर्मचारीकडे देण्यात आले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सचिव पदाचा नियम डावलून कारभार देण्यात आला.

न्यायालयीन कामकाजावर लाखोंचा खर्च

सचिव माळवे यांच्या विभागीय चौकशीकरिता चौकशी अधिकारी म्हणून ॲड. विटणकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी मेहनताना म्हणून ५० हजार देण्यात आले असल्याचा आरोप गावंडे यांनी केला.

तारण योजना राबविलीच नाही

शेतमाल तारणाचा व्याजदर कमी असल्याने शेतकरी बाजार समितीमधील तारण योजनेचा फायदा घेत असतात, मात्र बाजार समितीने कोट्यवधीचा निधी जमा असतानाही त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी केला नसल्याचा आरोप माजी आमदार संजय गावंडे यांनी केला आहे.

कॅशबुक आर्थिक पत्रामध्ये अनियमितता

बाजार समिती सचिव यांना माहिती मागितली असता, कॅशबुक आणि आर्थिक पत्रके तयार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले, मात्र पत्रात कॅश बुक जोडण्याचा उल्लेख केला. यावरून कॅशबुकमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येते.

याची माहिती मिळाली नाही

  • त्रयस्थ व्यक्तीचा कारभारात हस्तक्षेप.

  • वजनाचे खोटे अहवाल; बाजार शुल्काची चोरी.

  • आदेश डावलून बाजार बंद.

  • नियमबाह्य वाढविले हमालीचे दर.

  • चहा पाण्यावर नियमबाह्य खर्च.

  • शेत मालाचे पैसे वेळेवर दिले जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT