akola sakal
अकोला

Akola News : अकोला जिल्ह्यातील २८ शहिदांच्या शौर्यातून मिळणार प्रेरणा

हुतात्मा स्मारकातून उलगडणार प्रेरणादायी इतिहास

सकाळ वृत्तसेवा

अकोला - देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचे स्मारक अकोला येथील हुतात्मा स्मारक इथे उभारण्यात आले आहत. येथे २८ शहिदांचे पुतळे उभारण्यात आले असून, नवीन पिढीला त्यांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. या स्मारकाचे शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण होणार आहे.

जिल्हा विकास निधीतील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी ७४ लाख ९० हजारांचा निधी खर्च करून युद्ध शहीद स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. या स्मारकाचे लोकापर्ण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू पार्क चौकातील हुतात्मा स्मारकाचे नुतनिकरण करण्यात आले असून, येथे जिल्ह्यातील १९५२ पासून आतार्यंत शहीद झालेल्या सैनिकांचा प्रेरणादायी इतिहास उलगडून दाखविण्यात आला आहे. त्यांचे अर्धाकृती पुतळे येथे उभारण्यात आले आहे. येणाऱ्या पिढीसाठी ही हे स्मारक कायम प्रेरणादीय ठरणार आहे.

या शहिदांना करणार अभिवादन

शालीग्राम सुर्यभान दांगटे, उदेभान सीताराम तेलगोटे, महादेव नामदेव तायडे, दुर्योधन झाबुजी सिरसाट, यशवंत नथ्थु सरकटे, शेषराव श्रीराम म्हैसने, यशवंत आनंदराव देशमुख, राजकमल जस्सुलाल महाजन, प्रल्हाद भोलाजी साव, आनंदा सखाराम काळपांडे, अनिल ज्ञानदेव निखाडे, सुधाकर नागोराव खडेंकर,

नंदकिशोर तुकारामजी खाडेंकर, विनोद राजाभाऊ देशमुख, हरिचंद्र पंढरी वानखडे, विजय श्रीराम ताथेड, संतोष खुशाल जामणिक, ठाकरे निरंजन दयाल, दगडू रामजी लाहाने, भास्कर श्रीरीम पातोंड, तेजराव बळीराम दंदी, विजय बापुराव तायडे (मरणोपरांत सेना मेडल), मोहड विनोद यशवंत, कैलाश काशिराम निमकंडे, प्रशांत प्रल्हाद राऊत, संजू सुरेश खंडारे, आनंद शत्रुघ्न गवई, सुमेध वामन गवई (मरणोपरांत सेना मेडल).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT