akola news  sakal
अकोला

Akola news : प्रभारी अधिकारी आठवड्यातून दोनच दिवस हजर

उपचाराअभावी बकरीचा मृत्यू; कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

Akola News : महान येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ असून, याअंतर्गत एकूण २१ गावे आहेत. या मोठ्या दवाखान्यात कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी अनेक महिन्यांपासून नसल्याने परिसरातील पशुंचा उपचार प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या खांद्यावर आहे. परंतु, हेच प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनच दिवस हजेरी लावत असल्यामुळे त्याचा त्याचा फटका परिसरातील पशुपालकांना बसत आहे.

अधिकारी व कर्मचारी दवाखान्यात उपस्थित नसल्याने शेतात युरिया खाल्ल्याने बकरीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना ता. २ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

वस्तापूर येथील पशुपालक गुलाब भीमराव पावले यांच्या बकरीने शेतात युरिया खाल्ल्याने तिला उपचाराठी महान येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आणले. परंतु, या ठिकाणी नेहमीच अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बकरीचा मृत्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले.

पशु दवाखान्यात २४ तास पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी असणे महत्वाचे आहे. दवाखान्याचा प्रभारी वरखेड येथील पशु दवाखान्याचे अधिकारी डॉ.सय्यद मोहसीन यांचेकडे असून, ते आठवड्यातून दोन दिवसच येथील पशु दवाखान्यात हजर असतात.

वरखेड अंतर्गत १२ खेडी आणि महान पशु दवाखान्या अंतर्गत येणारे एकूण २१ खेडी, असे एकूण ३३ खेडीगावांतील पशूंचा उपचाराची जबाबरदारी केवळ एकच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

याठिकाणी कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी देण्यात यावा याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाच्या वरिष्ठांना मागणी केली असता, मार्च अखेर कायमस्वरुपी पशुवैद्यकिय अधिकारी देण्यात येईल, असे आश्वासनं वरिष्ठांकडून देण्यात आले. आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यामुळे पशुपालकांना खागसी डॉक्टरांकडून उपचार घेऊन आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

माझी कायमस्वरुपी नेमणूक वरखेड पशुदवाखाना श्रेणी २ येथे असून, महान येथील पशु दवाखान्याचा प्रभार माझ्याकडे दिल्याने आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी महान येथील पशुदवाखान्यात पशुपालकांना सेवा देतो. इतर दिवस वरखेड मुख्यालयात उपस्थित असतो.

- डॉ.सय्यद मोहसीन, प्रभारी पशुवैद्यकीय

अधिकारी, महान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT