Akola news: Shirpur Many were shocked to read the name of the village on it
Akola news: Shirpur Many were shocked to read the name of the village on it 
अकोला

एकच चर्चा: एकाच दिवसात नकाशावर आले नवीन गाव

सकाळ वृत्तसेेवा

शिरपूर जैन (वाशीम) :  मालेगाव कडून शिरपूर व पुढे रिसोडकडे सदर महामार्ग जातो. महामार्गाचे काम देगावच्या पुढे झाले आहे. उर्वरित रस्त्याचे कामही सुरू आहे. दरम्यान तयार झालेल्या रस्त्यावरील फलक, गावाच्या नावाचे दगड, पांढरे पट्टे, रेडियम लावण्याचे काम सुरू आहे. गावाच्या नावाचे मार्ग दाखवणारे फलकही लावण्यात येत असताना, शिरपूर ते रिसोड रोडवर चांडस फाट्यावर शिरपूर, चांडस, धरमपुरी असे लिहिलेला एक मोठा फलक आहे. यातील चांडस, शिरपूर दर्शवले हे योग्य आहे. मात्र धरमपुरी हे कोणते गाव या भागात आहे? असा प्रश्न अनेक नागरिकांना व वाहन धारकांना पडला आहे.

धरमपुरी हे नव्याने जन्माला आलेले गाव तर नाही ना? त्यावरुन नागरिकांत चर्चा रंगत आहेत. शिरपूरकरांच्या नजरेत किंवा स्मरणात आत्तापर्यंत धरमपुरी हे गाव आलेच नसल्याचे अनेक जणांकडून कळते. तेव्हा संबंधित विभागाने या गावाचा शोध लावला तरी कसा व कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच शिरपूर- मालेगाव रस्त्यावरून पांगरीकुटे येथे जाण्यासाठी मार्ग नाही असे अनेकांचे मत आहे.

सदर पांगरी कुटे हे गाव मालेगाव मेहकर रोडवर आहे. तेव्हा या रस्त्यावर भेरा फाट्यावर पांगरी कुटे गाव दर्शवणारा फलक असून, या फलकामुळे देखील अनेक वाहनधारक संभ्रमात पडले आहेत. हे चुकीचे फलक असतील तर त्यामुळे वाहनधारकांत संभ्रम निर्माण होतो. तेव्हा फलकांची सत्यता तपासूनच फलक लावण्यात यावेत. जेणेकरून वाहनधारकांची दिशाभूल होणार नाही.

मालेगाव ते शेनगाव या महामार्गाचे काम सुरू असून मालेगाव पासून रिसोड रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. रस्त्यावरील विविध फलक लावण्याचे काम सुरू आहे. शिरपूरजवळ एक फलक लावण्यात आला. त्यावरील गावाचे नाव वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. या फलकामुळे नागरिक संभ्रमात पडले असून यावरील लिखित गावाचा जन्म कधी झाला? असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करीत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT