Akola Police officer beaten Filed case at Malegaon police station
Akola Police officer beaten Filed case at Malegaon police station sakal
अकोला

अकाेला : कामात अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

मालेगांव : मालेगाव तालुक्यातील सुकांडा गावात निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस पथकाच्या कामात अडथळा आणून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ब्राह्मणवाडा पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवेळी ६ जून रोजी सुकांडा गावात बंदोबस्तासाठी तैनात सहायक पोलिस निरीक्षक तानाजी गव्हाणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विलास ताजणे पोलिस हेडकॉन्स्टेबल, अनिल कांबळे चालक, पोलिस हेडकॉन्स्टेबल उद्धव थोंबाळ, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, इत्यादींचे पथक ६ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून डायल ११२ वाहन क्रमांक M.H १२ S. Q. २०८४ घेऊन आपले कर्तव्य बजावत होते.

दुपारी १२.३० वाजता सुकांडा गावातील जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचे पथक उभे होते, त्याचवेळी सुकांडा गावातील रहिवासी हातात कोल्डड्रिंकची काचेची बाटली घेऊन पीत पीत पोलिसांचे पथकाजवळ पोहोचला आणि पोलिसांच्या टीमला उद्देशून म्हणाला, तुम्ही लोक आमच्या गावात काय करत आहात? सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास ताजणे यांनी त्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी येथे कर्तव्य बजावत असल्याचे सांगताच त्या व्यक्तीने पोलिस पथकाला शिविगाळ करून गाव सोडून जाण्यास सांगितले, या गावात तुमचे काम नाही, असे तो म्हणाला.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विकास ताजणे यांनी सदर व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने विलास ताजणे यांना जीवे मारण्याची धमकी दिली व तू काम कसे करतोस, ते मी बघतो असे म्हणत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास ताजणे यांचा गळा पकडून धक्काबुक्की केली. त्यामुळे ताजणे यांच्या गळ्यावर खरचटले.

पोलीस पथकाने त्या व्यक्तीला पकडून त्याचे नाव विचारले असता शंकर शिवाजी मुंडे, वय २३ रा. सुकांडा असे सांगून त्याने त्याच्या हातात धरलेल्या थम्सअपच्या काचेच्या बाटलीने स्वतः च्याच डाव्या दंडावर व अंगावर मारून घेतलें. तेथे उपस्थित असलेले सुकांडा गावचे पोलिस पाटील प्रतापराव विनायकराव घुगे, नीलेश दत्तराव आंधळे, गजानन राजाराम सोनोवने आदींनी मिळून भांडण सोडवले.

या घटनेची तक्रार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास ताजणे यांनी ६ जुनच्या रात्री ७.१४ वाजता मालेगांव पोलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर मालेगाव पोलिसांनी शंकर शिवाजी मुंडे, २३ रा. सुकांडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार राठोड करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT