akola rain update 125 mm rain monsoon weather irrigation projects farmer agriculture sakal
अकोला

Akola Rain Update : पावसाचा तडाखा; अकोला शहरात २४ तासांत १२५ मि.मी. पाऊस

जुने शहरातील ४० पेक्षा अधिक घर पाण्यात; मोर्णा, पूर्णा नदीची पातळी वाढली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : रिमझिम पावसानंतर बुधवारी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. एकाच दिवसात सरासरी ४५.७ मिलीमीटर पाऊस पडल्याने दाणादाण उडाली. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा मंडळात तर ११७ मि.मी. पाऊस झाला.

अकोला शहरातही हवामान खात्‍याने १२५ मि.मी. पावसाची नोंद केली. जिल्ह्यातील १६ मंडळात दमदार पाऊस झाला असून, या पावसाने अनेक शेतात पाणी साचले. बाळापूर तालुक्यात व्याळा मंडळामध्ये शेती खरडून गेली. दुसरीकडे या पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

खूप दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र, सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस होत नसल्याने चिंतेचे ढग दाटत चालले होते. सोमवारपासून मात्र जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली.

रिमझिम सुरू असलेल्या या पावसाने मंगळवारी जोर पकडला. बुधवारीही दिवसभर अधुनमधून सरी पडत होत्या. सायंकाळी सहा वाजतानंतर मात्र पावसाने रौंद्र रुप धारण केले. अकोला शहरासह सर्वच तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. तीन-चार तास सतत पाऊस कोसळत होता. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली.

अकोला जिल्ह्यातील १६ मंडळात दमदार पाऊस झाला. त्यात अकोला, पातूर, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील मंडळांचा समावेश आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा मंडळात तर पावसाने धास्तीच भरविली होती. २४ तासात तब्बल ११७.३ मि.मी. पाऊस पडला.

अकोला शहरात तर १२५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय व्याळा मंडळात ९२, वाडेगाव येथे ७५ मि.मी. पाऊस झाला. अकोला मंडळातही सरासरी ९८.५ मि.मी. पाऊस नोंदविल्या गेला.

कौलखेड मंडळात ८३.५, बार्शीटाकळी मंडळात ८८.८, महान मंडळात ६४. ३ मि.मी. पाऊस झाला. या पावसाने नुकतेच कोंब बाहेर आलेली पीक वाहून गेली. नदी-नाल्यांना पूर आला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दोन घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

गांधीग्राम येथील पुलाचा भराव गेला वाहून

गांधीग्राम : अकोला-अकोट मार्गावरील पूर्णा नदीचा ब्रिटिशकालीन पूल शतीग्रस्त झाल्याने पर्यायी पूल म्हणून चार कोटी खर्च करीत नवीन छोटा पूल बांधण्यात आला होता. हा पूल पहिल्याच पावसात पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद झाली.

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूर्णा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या दबावामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या आजुबाजूचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे पुराचे पाणी उतरले तरी हा पूल वाहतुकीसाठी कामी येणार नाही. या पुलासाठी खर्च केलेले चार कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.

शहरातील सखल भागात साचले पाणी

अकोला शहरात गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एकूण १२५.५ मि.मी. पाऊस झाला. या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले. रात्रीच्या वेळा झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका जुने शहराला बसला आहे. जुने शहरातील भिरड ले-आऊट, पार्वती नगर, गुरुदत्त नगर, लक्ष्मी नगर आदी भागात पाणी साचले होते.

त्यामुळे ४० पेक्षा अधिक घरात पाणी शिरले. खडकी परिसर, मलकापूर रस्ता एसबीआय बँकेजवळ, जठारपेठ येथील सदन भागात रस्ते तुंबले, बाराज्योर्तिलिंग मंदिर पुढे पाणी साचले होते तर तोष्णीवाल लेआऊट पाण्याची टाकी परिसरातही पाणी साचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला.

नाल्यात १० वर्षांचा बालक वाहून गेला

शहरातील खैर महंमद प्लॉटमध्ये बुधवारी रात्री पावसाने नालाल्या आलेल्या पुरात रिझवान अहमद इकबाल अहमद कुरेशी हा वाहून केला. रात्रीच शोध कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, सापडला नाही.

मोर्णा नदी परिसरात सुकोडा, भोंड, सांगवी बाजार, हातरूण, बोरगाव वैराळे आदी ठिकाणी शोध घेण्यात आला. अकोला तहसीलदारांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या शोध कार्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सुनील कल्ले,

हरीहर निमकंडे, वंदे मातरम शोध व बचाव पथकाचे उमेश आटोटे, मनिष मेश्राम, राजकुमार जामणिक, गौतम मोहोड, प्रदीप मोहोड, रहीम शहा, रामभाऊ दोरकर, अकोला मनपा अग्निशमन विभागाचे हारुण मनियास, मंडळ अधिकारी मोहारे व सदस्य सहभागी झाले आहेत.

आठ तालुक्यात अतिवृष्टी

जिल्ह्यातील आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली. यापैकी अकोला तालुक्यातील अकोला ९८.५, कापशी ९५.८, कौलखेड ८३.५, बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी ८८.८, राजंदा ११७.३, बाळापूर तालुक्यातील व्याळा ९२, वाडेगाव ७५ आणि बाभुळगाव ६६.५ मि.मी. पाऊस झाला. याशिवाय चौहट्टा मंडळात ६१.३ बाळापूर ६०.८, पारस ६२.३, पातूर ५१.५, घुसर ५६.५, आगर, उगवा प्रत्येकी ६१.३, बोरगाव मंजू ४५.८, शिवणी ५३.३, पळसो४२, महान ६४.३, धाबा ६०.८ आणि पिंजर मंडळात ५७.८ मि.मी. पाऊस नोंदविला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT