cotton sakal
अकोला

अकोला : पांढऱ्या सोन्याला विक्रमी भाव; कपाशी प्रतिक्विंटल १२ हजार रुपये

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला: शेतकरी अखंड मेहनतीने वर्षभर काबाडकष्ट करीत असतो आणि त्याच्या कष्टाचं फळ म्हणजे येणारे पीक. यावर्षी शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला (कापसाला) २५ मार्च रोजी १२ हजार इतका विक्रमी भाव आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.

अकोट बाजार समितीमध्ये विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यातून व महाराष्ट्रभरातून कापूस विक्रीसाठी येतो. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात सर्वाधिक पिकणाऱ्या पांढरे सोने अर्थात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमी आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरे सोने कापसाला यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव विठ्ठल झटाले याना मिळाला.

मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र व्यापाऱ्यांकडून कापसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळाला आहे.

अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीमधे जाहीर लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी केली जाते शिवाय व्यापाऱ्यांची व जिनिंगची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने बळीराज्याच्या कपाशीला चांगला दर मिळत आहे. आता बाजाराची आवक तुलनेने कमी झालेली असून, अस्मानी व सुलतानी संकटाचा कायम सामना करणाऱ्या बळीराजाच्या कपाशीला यावर्षी का होईना चांगला दर मिळतो आहे हे समाधान मोठे आहे.

विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मुख्य प्रशासक व प्रशासक मंडळाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना राबविलेले उपक्रम यामुळे कोरोणा काळातही बाजार समिती कधीही बंद पडली नाही. शेतकऱ्यांचा बाजार समितीप्रती असलेला विश्वास व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर लिलाव पद्धतीने होत असलेली खरेदी यामुळे महाराष्ट्रतील कपाशीला सर्वाधिक दर देणारी बाजार समिती म्हणून अकोट बाजार समितीचा नावलौकिक आहे.

- विशाल प्रभाकर बोरे, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT