Akola Ridhora villagers arranged marriage of lovers 
अकोला

अकाेला : ‘आली जुळून नाती... तोडून बंधनाला..!

रिधोरा येथील गावकऱ्यांनी लावला प्रेमीयुगुलांचा विवाह

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : ‘साजना तुझीच मी रे सांगिन या जगाला... आली जुळून नाती तोडून बंधनाला..!’ दोन विचारांचा धागा एका माळेत गुंफल्याने त्यातून निर्माण झालेल्या प्रेमाला तिच्या कुटुंबियांनी विरोध केला, मात्र कुटुंबाची बंधने तोडून तिने प्रियकराचे घर गाठले आणि ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’पासून ते ‘हम साथ साथ है’पर्यंत दोघांनी पक्का विचार करत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने एका प्रेमीयुगुलांचा विवाह पार पडला.

रिधोरा येथील श्री आरामेश्वर मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. कुलविंदर सिंग व दिपाली अशी प्रेमविरांची नावे आहेत. कुलविंदर हा मुळचा जालंधर (पंजाब) मधील असून, तो रिधोरा येथील कलकत्ता ढाब्याच्या परिसरात व्यवसाय करतो. त्याची छत्तीसगढमधल्या रायपूर येथील दिपाली या तरुणीशी दोन वर्षापूर्वी एका प्रवासा दरम्यान ओळख झाली. नजरेला-नजर होत दोंघांच्या मनात प्रेमाचे अंकूर फूलत गेले. शब्दावाचून शब्दांच्या पलीकडचं आणि साता समुद्रापासून, तर साताजन्मानंतरचं दोघांनीही एकमेकांना बोलून दाखवले.

सोशल मीडिया व मोबाइल फोनद्वारे प्रेमाच्या आणाभाका सुरू झाल्या. या प्रेमाची कुणकुण घरच्या मंडळींना लागताच मुलीच्या कुटुंबियांनी या प्रेमाला विरोध केला. प्रेमात आकंठ बुडालेल्या दिपालीने घरच्यांना न जुमानता मोबाइलवर बोलणे सुरू ठेवून आपले प्रेम अमर ठेवले. घरच्यांनी विरोध दर्शविला तेव्हा तिने घरातून पोबारा केला आणि सरळ रिधोरा गाठले.

देव-ब्राम्हणांच्या साक्षीने पार पडला लग्न सोहळा

त्या प्रेमविरांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला याची माहिती दिली. दोघांनी समितीकडे रीतसर अर्ज केला. समितीने सर्व बाजू तपासून लग्न लावून देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार ता. २५ जुलै रोजी गावकरी, तसेच तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी, पोलिस पाटील व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रिधोरा येथील श्री आरामेश्वर मंदिरात देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न सोहळा पार पाडला. यावेळी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मधूकर देशमुख, पोलिस पाटील सुजय देशमुख, अनिल टेकाडे, पवन अग्रवाल, सरपंच संजय अघडते, स्वामिनी विधवा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रमोद चौधरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT