Akola RTE third round 128 students admission done
Akola RTE third round 128 students admission done sakal
अकोला

अकोला : RTE च्या तिसऱ्या फेरीत १२८ विद्यार्थ्यांना लॉटरी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तिसरी फेरी नुकतीच पार पडली. या फेरीत प्रतीक्षा यादीतील १२८ विद्यार्थ्यांच्या पालकांना खासगी शाळेत प्रवेशासाठी लॉटरी लागली. त्यामुळे संबंधित पालकांना प्रवेशासाठी एसएमएस मिळाले असून, संंबंधितांनी कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आली.

त्यासोबतच प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची निवड लॉटरी काढून शासन स्तरावरून करण्यात आली आहे. लॉटरीमध्ये निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली, परंतु आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार नुकतीच प्रतीक्षा यादीतील १२८ विद्यार्थ्यांची लॉटरी शासन स्तरावरून काढण्यात आली.

प्रवेशाचा गोंधळ सुरूच

आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत गत दोन महिन्यांपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे, परंतु अद्याप प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. नियमित नंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान शाळा सुरू होण्यास जेमतेम दिवस शिल्लक असताना सुद्धा प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.

अशी आहे आरटीईची स्थिती

  • नोंदणीकृत शाळा ः १९६

  • आरक्षित जागा ः १९९५

  • प्राप्त अर्ज ः ६००३

  • जास्त प्राप्त अर्ज ः ४००७

  • प्रतीक्षा यादीतील निवड ः ५५९

  • प्रवेशीत विद्यार्थी ः २५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT