Akola Shegaon News 110th anniversary of Gajanan Maharaj celebrated without devotees
Akola Shegaon News 110th anniversary of Gajanan Maharaj celebrated without devotees 
अकोला

‘देऊळ बंद’ असल्याने भाविकांचे ‘दूर-दर्शन’

संजय सोनोने

शेगाव (जि.बुलडाणा) :  कोरोनाच्या सावटामुळे संत गजानन महाराज मंदिरातील ११० वा पुण्यतिथी उत्सव साध्या पद्धतीने व अंतर्गत साजरा करण्यात आला.  संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा झाला.

मंदिर बंद असलयाने रविवारी सकाळी अगदी साध्या पद्धतीने मोजके पुजारी व विश्वस्थ यांचे उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाच्या सावटामुळे मंदिरातील सर्व उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा झाला. यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द झाल्याने भाविकांची निराशा झाली. पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यामुळे टाळमृदंगाचा आवाजही यावर्षी शेगावात ऐकू आला नाही. दरवर्षी लाखो भाविक संतनगरीत दर्शनाला हजेरी लावत असतात. मात्र यंदा भाविकांनी घरी राहून मनमंदिरातच संत गजाननाला वंदन केले.

भक्तांसाठी पुण्यतिथी उत्सवाला मोठे महत्त्व आहे. देशातीलच नव्हे तर परदेशातील भक्त या दिवशी श्रीच्या चरणी लीन होतात. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास ४ ते ५ लाख भाविक हजेरी लावतात.

परंपरेप्रमाणे उत्सवाला प्रारंभ होतो आणि शहरातून श्रीची पालखी काढण्यात येते. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे भक्तांना गजाननाचे दर्शन घेता आले नाही. मंदिर बंद असले तरी सकाळपासूच शेगाव शहर व तालुक्यातील हजारो भाविकांनी मंदिराच्या बंद प्रवेशद्वाराच्या समोर उभे राहून मंदिराचे कलशाचे दर्शन घेतले.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT