soyaben
soyaben sakal
अकोला

Akola : सोयाबीन उत्पादनात कमालीची घट; कापणीचे दर वाढले; महिलांना चारशे, तर पुरुषांना सहाशे रोजंदारी

अनिल दंदी

बाळापूर - सोयाबीनच्या कापणी बरोबरच मळणीनेही वेग पकडला असून, उत्पादनात कमालीची घट येत आहे. दुसरीकडे वाढलेल्या कापणी व मळणीच्या दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. बाळापूर तालुक्यातील ५७ हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून, ३१ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली.

परिसरात सध्या सोयाबीन पिकांची सोंगणी सुरू असून, मळणी यंत्रामार्फत सोयाबीन काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच सोयाबीन पिकाचे सध्याचे बाजारभावही कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

चालू वर्षी पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पिकाची पूर्ण वाताहत झाली आहे. यलो मोझॅक व पाण्याअभावी पीक वाळल्यामुळे अनेकांनी पिकामध्ये ट्रॅक्टर घालून नांगरट केली आहे. परतीच्या पावसामुळे काही पिकांना थोडेफार जीवदान मिळाले आहे.

त्यांनी सोंगणी व काढणीचे काम हाती घेतले आहे. मात्र, सोयाबीन पीक व त्यातील गवत पाहून व शेतकऱ्यांची गरज ओळखून हे दर प्रति एकरी तीन हजार रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत वाढले. सोयाबीन पीक चांगले आले, तर एकरी सरासरी १३ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. मात्र, यावर्षी सरासरी उपादन प्रति एकरी दोन ते चार क्विंटल मिळत आहे.

कापणीचे दर वाढले

सोयाबीनच्या कापणीचे दर तीन ते चार हजार प्रति एकर दरम्यान आहेत. दुसरीकडे तालुक्याच्या काही भागात पाच हजार रुपये प्रति एकरपर्यंत सोयाबीन कापणीचे दर राहिले. एकीकडे कापणीचे दर वाढलेले असतानाच मळणीच्या दरालाही १५० रुपये प्रति कट्टा,

तर क्विंटलला ३०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. महिला मजुराला दिवसाला ४०० ते ५०० रुपये, तर पुरुष मजुराला ५०० ते ६०० रुपये मजुरी मोजावी लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सोयाबीन या मुख्य पिकावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, यंदा सोयाबीनच्या दरात कायम घटच झालेली आहे.

मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

सोयाबीन काढणीस वेग आला असला, तरी साडेतीन ते चार हजार रुपये प्रति एकरी भाव देऊन सुद्धा मजूर येत नसल्याचे चित्र आहे. अति पावसाच्या तडाख्यातून काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या सोयाबीन काढणीस वेग आला असला, तरी चार हजार रुपये प्रति एकरी भाव देऊन सुद्धा मजूर येत नसल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

मोठ्या मुश्किलीने मजूर मिळाले, तरी त्यांची ने-आण करण्यास हजार ते पंधराशे रुपये वाहनाचा वाढीव खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे. त्यामुळे सोंगणीस एकरी सहा ते साडेसहा हजारापर्यंत जास्त खर्च करावा लागत आहे. बाजारात मात्र सोयाबीनला अवघा साडेचार हजार प्रति क्विंटल भाव असल्याने जमा-खर्चाचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

मजुरांअभावी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

तालुक्याच्या काही भागात सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांची आता हार्वेस्टरला पसंती दिसून येत आहे. मजुरांची वाढती रोजंदारी व तुटवड्यामुळे शेतकरी हार्वेस्टरला प्राधान्य देत आहेत. मळणीसाठी काढलेले सोयाबीन एकत्र करणे, मळणी करणे यासाठी श्रम खर्ची पडतात.

त्यासाठी मजूर लागतात. त्याचबरोबर मळणीसाठी प्रतिगोणी अडीचशे ते तीनशे प्रमाणे अधिकचा खर्च करावा लागतो. काढलेल्या मालाची राखणदारी व नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करण्याचे काम करावे लागते, अशा सर्व वेळखाऊ आणि कष्टदायक बाबीतून सुटका करण्यासाठी हार्वेस्टर हा पर्याय उपलब्ध झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT