Teacher sakal
अकोला

Akola : शिक्षकांच्या वेतनात अनुदानाचा अडथळा!

दिवाळीपूर्वी वेतनात अडचणी; शिक्षक संघटनांकडून आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

दिवाळीपूर्वी वेतनात अडचणी; शिक्षक संघटनांकडून आंदोलनाचा इशारा

अकोला : दिवाळीपूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. मात्र, अनुदानच नसल्याने दिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये रोष असून, दिवाळीपूर्वी वेतन न मिळाल्यास निषेधाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा शिक्षक समितीने दिला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन व निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. त्यानुसार सर्व विभागांकडून वेतन देयके तयार करण्यात आली आहे.

मात्र, जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला वेतनासाठी पुरेसे अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाला ता. १९ ऑक्टाेबर राेजी या संदर्भात पत्र देवून जि.प. शिक्षकांच्या वेतनासाठी मागणीच्या तुलनेने कमी अनुदान प्राप्त झाली असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे.

सहा कोटी अनुदान कमी!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४३ लाखाची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र ३७ लाख अनुदान मिळाले. त्यासोबतच शिक्षकांच्या वेतनासाठी ३१ काेटी गरजेचे असताना ३७ काेटीच अनुदान मिळाले. सहा कोटी अनुदान कमी मिळाल्यामुळे दिवाळीपूर्वी वेतन कसे हाेईल, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT