Akola Washim Marathi News This city of Balasaheb was ruined by the royal shelter !, an abusive alliance for power; The leader became the contractor 
अकोला

बाळासाहेबांची ही नगरी राजआश्रयानेच बकाल केली!, सत्तेसाठी अभद्र युती; नेतेच झाले कंत्राटदार

राम चौधरी

वाशीम :  कधीकाळी वत्सगुल्म राजाची राजधानी ते बाळासाहेबांची समृध्द नगरी अशी ओळख असलेले शहर एक बकाल जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. धुळीने माखलेले रस्ते, रस्त्याच्यावर कपाळमोक्ष करणारे चेंबर व नवीन बनविलेल्या रस्त्यावरील उडणारी गिट्टी हे राजाश्रयाखाली फोफावलेल्या कंत्राटदाराचे पातक शहरवासीयांच्या नशिबी उतरले असून सत्तेतून पैसे मिळविण्यासाठी राजकारणीच कंत्राटदार झाल्याने बाळासाहेबांच्या या नगरीची अवस्था बकाल झाली आहे.


वाशीम शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. शहराच्या सभोवताली नवीन वसाहती उभ्या राहत आहेत. या वसाहतीची जहागिरी शहरातील राजकारण्यानी घेतल्यानंतर या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचे दायीत्वही त्यांनी घेतले होते.

सुविधा निर्माण होतील, रस्ते तयार होतील ही आशा शहरवासीयांना होती मात्र, रस्ते बनविण्याचे कंत्राट आपल्याच बगलबच्यांना मिळाले पाहिजेत त्यातून आपलेही आर्थीक हीत साधले गेले पाहिजेत. या हेतूने शहराचा कायापालट करण्याची शेखी मिरविणाऱ्या नेत्यांनी आपलेच हीत साधून शहरवासीयांच्या नशिबी मात्र, खड्डे आंदण देण्याचे काम केले आहे.

शहरामध्ये गत चार वर्षात कोट्यावधी रूपयांचे रस्ते तयार केले मात्र, सहा महिन्यातच हे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. यामध्ये राजकीय छत्रछायेत नांदणाऱ्या कंत्राटदारांनी माया कमावून घेतली असली तरी, नागरिकांचा वनवास मात्र कायम आहे. स्वार्थ्यासाठी राजकीय कोलंटउड्या मारत कधी काळच्या राजकीय शत्रुंच्या गळ्यात गळे घालण्याचे काम फक्त समर्थक कंत्राटदाराचे हीत साधण्यासाठीच केल्या जात असल्याच आरोप जनतेमधून होत आहे.


 
चालविण्यापेक्षा अडविण्यातच धन्यता
शहर विकासासाठी राज्य शासनाने भरपूर निधी दिला. मात्र, तो निधी आपल्या ले-आऊटच्या रस्त्यासाठी वापरण्याच्या क्लृप्तीने अनेक अभद्र राजकीय युतींना जन्म दिला. यातूनच अकोला नाका ते पाटणी चौक हा शहरातील मुख्य मार्ग रखडला. निविदा प्रकाशीत झाली. मात्र, तरीही गेल्या सात वर्षापासून या रस्त्यावर नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागतात. याआधीही हा रस्ता शहरातील राजकीय नेत्याच्या छत्रछायेत राहणाऱ्या कंत्राटदारानेच तयार केला होता. सहा महिन्यात या रस्त्याचे तिन-तेरा वाजल्यानंतरही राजकीय दबावात पालिकेच्या बांधकाम विभागाने निरलज्जतेचा कळस गाठत या कंत्राटदाराला क्लीनचिट दिली होती.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update : भरधाव कारने ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT