Akola Sanjay Rathod 
अकोला

Akola : शिंदेसेनेचे पालकमंत्री उद्धव सेनेच्या गराड्यात

कार्यकर्ते संभ्रमात: गटात उपगटाची पुन्हा सुरवात?

राम चौधरी

वाशीम : राज्याच्या राजकारणात शिवसेनेतील सुंदोपसुंदी टोकाला गेली असताना वाशीम जिल्ह्यात मात्र शिंदेसेनेच्या पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात उद्धव सेनेचे शिलेदार पालकमंत्र्यांना गराडा टाकून दिसल्याने दोनही सेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर मातोश्रीवर जाऊन आणाभाका घेणारे नेते पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पायघड्या टाकत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता झुंजविण्यासाठीच वापरला जातो अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

संजय राठोड यांचा शिरपूर दौरा शिंदेसेनेला बेदखल करण्यासाठी होता की पुन्हा शिंदेसेनेतील जुनी गटबाजी चुचकारण्यासाठी हीच चर्चा राजकीय गोटात आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडत भाजपच्या साथीने सत्ताशकट हाती घेतला. तेव्हापासून राज्यात शिंदेसेना विरुद्ध उध्दवसेना एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. ही राजकीय लढाई रस्त्यावरही लढली जात आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा राजकीय धुमशान सुरू होत असताना शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड यांचे मन अजूनही जुन्या घरातच रमले कि काय असा प्रश्न निर्माण करणारी घटना वाशीम जिल्ह्य़ातील जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूरात घडली. संजय राठोड एकनाथ शिंदे मंत्रीमंडळात मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे वाशीम व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बहाल केले गेले.

रविवारी (ता.२) संजय राठोड पालकमंत्री म्हणून शिरपूर येथे आले होते. या कार्यक्रमाला शिंदे गटातील नेते व शिवसैनिक उपस्थित राहणार हे अपेक्षित असताना या कार्यक्रमात चक्क उध्दव सेनेचे विश्वनाथ सानप व अशोक अंभोरे यांची उपस्थिती राजकीय जाणकारांच्या भूवया उंचविणारी ठरली. मुख्य म्हणजे विश्वनाथ सानप व अशोक अंभोरे हे दोन नेते उध्दव सेनेशी एकनिष्ठ असल्याचे पुरावे उध्दव ठाकरेंच्या मातोश्रीवरून जिल्ह्यात दवंडी पिटवून सांगीतले गेले असताना पालकमंत्री संजय राठोड उध्दवसेनेच्या गराड्यात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर विश्वनाथ सानप व अशोक अंभोरे शिंदे गटावर टिका करण्यात आघाडीवर होते. मोर्चे निदर्शनातही यांचा सहभाग लक्षणीय असताना पालकमंत्री शिंदे गटाच्या वजाबाकीचे राजकारण करून काय साध्य करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुन्हा गटात तट

एकसंघ शिवसेनेत संजय राठोड यांच्याकडे पालकमंत्रीपद असताना जिल्ह्यात शिवसेनेची दोन गटात विभागणी करण्याचे श्रेय संजय राठोड यांच्याकडेच जाते. आता खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड एकाच गटात असताना पालकमंत्र्यांच्या दौर्यात स्थानिक खासदार किंवा जिल्हाप्रमुख यांना माहीती नसने हा योगायोग नक्कीच नाही. राज्यस्तरावर शिंदे गट आपली संघटन बांधणी युध्दस्तरावर करत असताना खुद्द पालकमंत्रीच आपल्या गटाला अव्हेरून उध्दव सेनेच्या गराड्यात धन्यता मानत असतील तर शिंदे गट वाढेलच कसा असा प्रश्न कार्यकर्ते स्व:तलाच विचारत आहेत.

आम्ही फक्त लढायचेच का?

शिंदे गट व उध्दव ठाकरे गटात प्रचंड राजकीय असुया निर्माण झाली आहे. दोनही गट मोर्चे निदर्शनाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहत आहेत. काही ठिकाणी राड्याच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावरच्या लढाईत सर्वसामान्य शिवसैनिक आपल्याच आप्ताच्या विरोधात टोकाचा विरोध करत आहे. नेते मात्र कार्यकर्त्यांच्या भावना बाजूला सारत प्रतिस्पर्ध्यांच्या छावणीत डेरे टाकत असतील तर आम्ही फक्त लढायचेच का असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT