Akola zilla parishad meeting sakal
अकोला

Akola : स्थायीच्या सभेत उपाध्यक्ष-शिवसेना सदस्यांत जुंपली; उपाध्यक्षांनी ग्रा.पं.च्या विकास कामाची फाईल रोखल्याचा आरोप

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी (ता. ३०) दोन ग्रामपंचायतमध्ये सभागृह बांधकामाला मंजुरी देण्याची फाईल उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी रोखून ठेवल्याच्या मुद्द्यावर शिवसेना सदस्य गोपाल दातकर व उपाध्यक्षांमध्ये खडाजंगी झाली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी (ता. ३०) दोन ग्रामपंचायतमध्ये सभागृह बांधकामाला मंजुरी देण्याची फाईल उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी रोखून ठेवल्याच्या मुद्द्यावर शिवसेना सदस्य गोपाल दातकर व उपाध्यक्षांमध्ये खडाजंगी झाली. उपाध्यक्षांनी मुद्दाम फाईल स्वतःकडे ठेवल्याचा आरोप दातकर यांनी केला. दोन दिवसात फाईल पुढे न गेल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दहिहांडा व दानापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये ५७ लाख रुपयांचे विकाम काम करण्याची फाईल उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती सुनील फाटकर यांनी त्यांच्याकडे विनाकारण रोखून ठेवल्याचा आरोप सभेत शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी केला.

त्यावर उपाध्यक्ष फाटकर सभागृहात बोलत असताना सभागृहात अध्यक्षांव्यतिरिक्त कोणीच बसून उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे उपाध्यक्षांनी सुद्धा उभे राहून बोलण्याची मागणी गोपाल दातकर यांनी केली. त्यावर उपाध्यक्ष फाटकर सभागृहात उभे राहिले व त्यांनी फाईलमध्ये त्रुटी असल्याने फाईल स्वतःकडे ठेवल्याची माहिती दिली.

यावेळी उपाध्यक्ष फाटकर व गोपाल दातकर यांच्यात खडाजंगी झाली. दोन दिवसात फाईल पुढे न गेल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सभेत गोपाल दातकर यांनी दिली. सभेत मंचावर अध्यक्ष संगीता अढाऊ,

उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, सभापती माया नाईक, सभापती रिझवाना परवीन, सभापती योगीता रोकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्यासह अन्य अधिकारी हाेते.

गणवेश शिवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश न मिळाल्याचा मुद्दा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी (ता. ३०) विराेधकांनी उपस्थित केला. गणवेशासाठी कापलेले कापड न मिळता थेट गठाणच मिळाल्या आहेत.

त्यामुळे शिवण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितल्याची माहिती शिक्षाधिकाऱ्यांनी दिली. त्यावर ‘ना नफा ना ताेटा’ या धर्तीवर काही स्वयंसेवी संस्था गणवेश देण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून गणवेशावर ताेडगा काढण्यात येईल. अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी मांडली. त्यावर अध्यक्षांनीही कार्यवाही करण्यास सांगितले.

इतर मुद्द्यांवर वादळी चर्चा

सभेत बांधकाम कामगारांना ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नसल्याचा मुद्दा सदस्य गोपाल दातकर यांनी उपस्थित केला. त्यावर कामगारांना प्रमाणपत्र न देण्याऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर यांनी केली. याबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बांधकाम विभागामार्फत अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र व इतर बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप सदस्य गोपाल दातकर यांनी केला. नवे बांधकाम दोन-तीन वर्षातच खराब होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमून चौकशी करण्यात येईल, असे अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT