जिल्हापरिषदेमध्ये लवकरच ई-ऑफिस प्रणाली होणार आहे. esakal
अकोला

Akola News : मिनी मंत्रालयात लवकरच ई-ऑफिस प्रणाली

E- Office Technology : तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य होणार

सकाळ वृत्तसेवा

Akola : जिल्हा परिषदेतील सर्व विभागांध्ये लवकरच ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विभाग पेपरलेस होतील. यापूर्वीच अधिकारी, कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण देखील झाले असून लवकरच ही प्रणाली अंमलात येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासकीय कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत ऑफलाइन काम असल्याने अनेक कामांमध्ये विलंब लागतो. त्याचा विपरीत परिणाम विकास कामांवरही होतो.

एखाद्या प्रकरणाची फाईल प्रलंबित असल्यास कोणत्या टेबलवर अथवा कर्मचाऱ्याकडे फाइल अडकून बसली आहे, याचीही माहिती उपलब्ध होत नाही. सार्वजनिक तक्रारी निवारणासाठी ऑनलाइन यंत्रणा नसल्याने नागरिकांचीही अडचण होते. यावर उपाय म्हणून ई-ऑफिस प्रणालीकडे अनेक कार्यालय वळले आहेत. त्यामुळे तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य होते.

ही बाब लक्षात घेवून जि.प.मध्येही लवकरच ई ऑफिस प्रणाली सुरू होणार आहे. त्यामुळे ई-प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या कामाला गती मिळेल. ई-प्रणाली सुरू झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये डिजिटल सहीचाही वापर केला जाणार आहे.

झेडपीच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज ई-ऑफीस या संगणकीय प्रणालीत चालेल. त्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. सर्वप्रथम बांधकाम विभागाचे कामकाज ई-ऑफिस पद्धतीने सुरू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता प्रकाश उमाळे यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT