Mango
Mango File photo
अकोला

कोकणाच्या ‘हापूस’ची अकोलेकरांना गोडी फार

विवेक मेतकर

अकोला ः कोकणातील हापूस आंबा तसा जगभरात प्रसिद्ध आहे. अकोलेकरांनाही त्याची चांगलीच गोडी असून, दरवर्षी अकोल्याच्या बाजारात तो विक्रीसाठी येत असतो. मात्र, कोरोनामुळे इतर फळांसोबतच हापूस खरेदी-विक्रीची सुद्धा अडचण झाली आहे. परंतु, या विपरीत परिस्थितीलाही अर्थार्जनाची संधी बनवित अकोल्यातील शेकडो युवकांनी साखळी व्यवसायातून घरपोच हापूस विक्री करण्याचा बेत आखला आहे आणि व्यावसायीक दृष्टीकोन ठेऊन अनेकांनी हापूस खरेदीसाठी कोकणात हजेरी सुद्धा लावली आहे.

प्रशासनाचाही सक्रिय सहभाग
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून आणि अडचणीच्या काळात अर्थार्जनाचा प्रर्याय म्हणून, गेल्यावर्षी लॉकडाउन कालावधीत भाजीपाला, फळे व इतर जिवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध बचत गट, शेतकरी बचत गट व शेकडो बेरोजगार युवकांनी पुढाकार घेतला होता. जिल्ह्यातील कृषी विभाग, आत्मा व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुद्धा या साखळी व्यवसायात सक्रिय सहभाग घेत लोकांना घरपोच फळे, भाजीपाला व जिवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. याच साखळ्याच्या माध्यमातून लॉकडाउन कालावधीतही अकोलेकरांना देवगड, रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चव गेल्यावर्षी चाखता आली.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT