benefit of crop insurance should available to eligible farmers ajit kumbhar in meeting Sakal
अकोला

Akola : पीक विम्याचा लाभ पात्र शेतकऱ्याला मिळावा; आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Crop Insurance : नियोजन भवनात शुक्रवारी (ता. २) पिक विम्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पीक विमा योजनेतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी हाच पीक विमा योजनेचा हेतू असून पीक विमा प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा ठिकाणी सरासरीनुसार नुकसानभरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

नियोजन भवनात शुक्रवारी (ता. २) पिक विम्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ते बोलत होते. यावेळी आ. अमोल मिटकरी, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, कृषी अधीक्षक शंकर किरवे, मूर्तीजापूरचे उप विभागीय अधिकारी संदीप पवार,

तहसीलदार शिल्पा बोबडे आदी उपस्थित होते. २०२३-२४ हंगामातील पिक विमा योजनेतील तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात तसेच अपात्र दाखवण्यात आलेल्या प्रकरणाची तपासणी करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी दिल्या. यावेळी पिक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी तथा शेतकरी आदी उपस्थित होते.

आमदारांनी वाचला तक्रारींचा पाढा

बैठकीत आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा योजने संदर्भातील अडचणी मांडत पिक विमा प्रतिनिधींनी तपासणी करून त्वरित अडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या.

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असून एकही पात्र शेतकरी त्यापासून वंचित राहू नये याबाबत विमा प्रतिनिधींना निर्देश दिले.

आमदार अमोल मिटकरी यांनी शासनाच्या योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करण्याच्या सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Petrol Explosion: पेट्रोलच्या भडक्यात भाजलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Sharad Pawar : शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली चुकीची, शरद पवार यांचे मत; सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा

SCROLL FOR NEXT