BJP and Congress
BJP and Congress SAKAL
अकोला

अकोला : काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचे प्रत्युत्तर; दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी अकोल्यात पुन्हा एकदा आमने-सामने आले. काँग्रेसने सोमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या घरापुढे आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शेकटो भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून काँग्रेसच्या आंदोलनाला आक्रमक प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमदारांच्या घरापर्यंत पोहोचता आले नाही. पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर भाजपनेही आंदोलन मागे घेतले.(Prime Minister Narendra Modi statement)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महाराष्ट्र सरकारमुळे देशभर पसरल्याचे लोकसभेतील भाषणादरम्यान सांगितले होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान असून, त्यासाठी पंतप्रधान मोदी व भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी काँग्रेसने राज्यभर भाजपच्या नेत्यांच्या घरापुढे आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या राऊतवाडी स्थिती घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी जठारपेठ चौकाकडून आमदार रणधीर सावरकर यांच्या घराकडे येत असताना त्यांना त्यापूर्वीच पोलिसांनी थांबविले. काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी तेथूनच घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी कार्याध्यक्ष राजेश भारती, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, विजय देशमुख,

मनपाचे विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन, प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, कपिल रावदेव, निखिलेश दिवेकर आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या घरापुढे भाजपचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी एकत्र आले होते. काँग्रेसची घोषणाबाजी सुरू होतात पदाधिकारी व कार्यकर्ते त्या दिशेने घोषणाबाजी करीत सरसावले होते. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक, आरपीटीएस दलाचे जवान आदींचा यावेळी बंदोबस्त होता. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केल्यामुळे आमदार सावरकर यांच्या घरापुढेच भाजप कार्यकर्त्‍यांना काँग्रेस विरोधी घोषणाबाजी करून प्रत्युत्तर दिले.

पोलिसांची काँग्रेसवरच कारवाई, भाजपला सोडले

आमदार रणधीर सावरकर यांच्या घरापुढे आंदोलन करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या २५ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अर्धातासात प्रतिबंधात्मक कारवाई करीत सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये घेवून गेले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आधी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कारवाई करा, असा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या म्हणण्याला न जुमानता काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गाडीत बसवून घेवून गेले. त्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता जाऊ दिले.

सर्व रस्ते केले होते बंद

काँग्रेसच्या आंदोलन लक्षात घेता पोलिसांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेट टाकून बंद केले होते. रणपिसे नगरकडून येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते. रामनगरकडून येणारा रस्ताही बंद करण्यात आला होता. जठारपेठकडून येणारा रस्त्यावरही बॅरीकेटस् टाकण्यात आले होते. मोरेश्वर कॉलनीकडून येणाऱ्या रस्त्यावरही पोलिस बंदोबस्त होता. काँग्रेसच्या २५ कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी १०० पोलिस, तीन पोलिसांच्या मोठ्या गाड्या, तीन पोलिस स्टेशनचे ठाणेदार, विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक, शिघ्र कृती दलाचे जवान आदींचा बंदोबस्त होता.

''महाराष्ट्राचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागवी यासाठी काँग्रेसने पोलिसांकडे परवानगी मागणू शांततामय मार्गाने आंदोलन केले. काँग्रेस महाराष्ट्राचा अवमान कधीही सहन करणार नाही. जोपर्यंत भाजप नेते महाराष्ट्राची माफी मागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल.''

- अशोक अमानकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

''काँग्रेसकडून राज्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वास्तवादी वक्तव्याचा आधार घेत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा कोणताही अवमान केला नाही. राज्य सरकार त्यांचे अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाला भाजप सामोरे जाण्यास सक्षम आहे.''

- आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष, भाजप.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT