लालू प्रसाद यादवांना दणका! पाच वर्षांचा कारावास, 60 लाखांचा दंड

चारा घोटाळा प्रकरणी रांचीच्या सीबीआय कोर्टानं सुनावली शिक्षा
RJD chief Lalu Prasad Yadav convicted Fodder scam
RJD chief Lalu Prasad Yadav convicted Fodder scamesakal

नवी दिल्ली : बहुचर्चित चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात (Fodder Scam Case) माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा विशेष सीबीआय कोर्टाकडून (Ranchi CBI Court) सुनावली आहे. त्याचबरोबर ६० लाखांचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. लालूंविरोधातील हा पाचवा चारा घोटाळा आहे. (fodder scam CBI court sentences Lalu Prasad Yadav five years imprisonment)

दोरांडा कोषागारातून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणात लालूंना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी लालूंसोबतच्या ७५ आरोपींना १५ फेब्रुवारी रोजी कोर्टानं दोषी ठरवलं होतं. तर इतर २४ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. यांमध्ये ३६ जणांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर दोषींना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षा सुनावण्यात येत आहे.

RJD chief Lalu Prasad Yadav convicted Fodder scam
Whether Forecast : यंदा मॉन्सून सामान्य राहणार; स्कायमेटचा अंदाज

कसा झाला घोटाळा उघड?

या घोटाळ्यात अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. हे प्रकरण सन १९९०-९२ च्या दरम्यान घडलं आहे. या घोटाळ्यातील अधिकारी आणि नेत्यांच्या फसवणुकीची नवी मालिकाच समोर आली आहे. यामध्ये ४०० रेड्यांना हरयाणा आणि दिल्लीहून स्कूटर आणि मोटरसायकलवरुन रांचीपर्यंत आणण्यात आलं होतं. म्हणजेच त्यांच्या वाहतुकीसाठी ज्या वाहनांचे नंबर दाखवण्यात आले होते ते स्कूटर आणि मोटरसायकलचे नंबर देण्यात आले होते. अशा प्रकारे खोटी माहिती नोंदवण्यात आली होती. सीबीयाच्या चौकशीत हे देखील उघड झालं की, अनेक टन पशूखाद्य, मका, बदाम, मीठ याच्या वाहतुकीसाठी स्कूटर, मोटरसायकरचे नंबरही देण्यात आले होते.

RJD chief Lalu Prasad Yadav convicted Fodder scam
करहलमध्ये पुन्हा मतदान घ्या; अखिलेश विरोधातील भाजप उमेदवाराची मागणी

घोटाळ्यात अनके मंत्री-कर्मचाऱ्यांचा समावेश

सीबीआयच्या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर कट-कारस्थान रचलं गेलं होतं. यामध्ये राज्यातील नेते, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग होता. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्र यांच्यासह अनेक राज्यमंत्र्यांना अटक झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com