Gopikishan Bajoriya-Vasant Khandelwal
Gopikishan Bajoriya-Vasant Khandelwal google
अकोला

अकोला विधानपरिषद : भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीला धक्का

सकाळ डिजिटल टीम

अकोला : अकोला बुलडाणा-वाशीम या जागेवर विधानपरिषद निवडणूक (Akola Legislative council Election) घेण्यात आली. यामध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपचे वसंत खंडेलवाल (BJP Vasant Khandelwal) यांनी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया (Shivsena Gopikishan Bajoriya) या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धक्का देत विजय मिळविला आहे. विजयाची हॅट्रीक असलेल्या बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीत अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली. त्यांना 443 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना 334 एवढी मते मिळाली . 31 मते बाद झाली. शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा १०९ मतांनी पराभव झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी पाच टेबलावर घेण्यात आली. प्रत्येक टेबलावर पाच फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी केंद्रावर महाविकास आघाडी तसेच भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील तिन्ही मतदारसंघातील 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदान केले. बाजोरिया पुन्हा चमत्कार दाखवतात की खंडेलवाल त्यांची विजयी घोडदौड थांबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील 22 मतदान केंद्रातून मतपेट्या निवडणूकीच्या दिवशी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. अखेर निकालाचा दिवस उजाडला. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. यात तिन्ही जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी सहभाग घेतला. सोशल मीडियावर दोन्ही पक्षाकडून आपलाच विजय नक्की अशाप्रकारच्या पोस्ट फिरत होत्या. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य या नात्याने गेली अठरा वर्षे गोपीकिसन बाजोरिया या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण बदलले. त्यामुळे भाजपने उद्योगपती वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात तुल्यबळ लढत झाली.

अंतर्गत राजकारणाचा महाविकास आघाडीला फटका

महाविकास आघाडीतील मतभेद, याशिवाय शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस या सर्वांचा परिणाम विधान परिषदेच्या मतदानावर झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महा विकास आघाडीतील मतदान मोठ्या प्रमाणावर फुटल्याने गोपीकिशन बाजोरिया त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने भाजपला दिलेली साथही या विषयावर परिणाम करणारी ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT