राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मंथन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मंथन sakal
अकोला

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मंथन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक रालतो विज्ञान महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिसंवाद संपन्न झाला. परिसंवादाचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता मानव विद्या व विद्यमान प्राचार्य महिला महाविद्यालय, अमरावती डाॅ. अविनाश मोहरील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बीजीई संस्थेचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता हे होते, तर प्रमुख उपस्थितीत आरडीजी महिला महाविद्यालयातील डाॅ. रूपा गुप्ता, प्राचार्य गजानन एगांवकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय नानोटी, कार्यक्रमाच्या संयोजिका डाॅ. पी.टी. अग्रवाल मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्ज्वलन करून विद्यापीठ गिताने करण्यात आली.

मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागतपर मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय नानोटी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप मालखेडे यांचेप्रती आभार व्यक्त केले. मंचावरील सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करून परिसंवादा विषयी माहिती दिली. उद्घाटक डाॅ. अविनाश मोहरील यांनी सदर परिसंवादाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून परिसंवादाला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात ॲड. मोतीसिंह मोहता यांनी संस्था नेहमी सकारात्मक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असते. अशा कार्यक्रमांचा लाभ सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सुधीर कोहचाळे, तर आभार प्रदर्शन डाॅ. अे.जी. सरप यांनी केले.

अभ्यासक्रम निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचे गुण लक्षात घ्यावे

पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. ममता इंगोले होत्या. परिसंवाद उद्‍बोधनात डाॅ. मोहरील यांनी नॅशनल एज्युकेशन पाॅलिसीमध्ये शिक्षकांची सर्वात जास्त महत्वाची भूमिका राहणार आहे. त्यासाठी शिक्षकाला आवश्यक ती स्वायतत्ता व शैक्षणिक वातावरण मिळायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. अभ्यासक्रमाची निर्मिती करताना परिसराचा अभ्यास सामाजिक दृष्टीची उपयोगिता, विद्यार्थ्यांध्ये असणारे विशेष गुण लक्षात घेता, अभ्यासक्रम निर्मीती करणे गरजेचे आहे. विषय व विद्याशाखांच्या मर्यादा दूर ठेवून बहूशाखीय शिक्षण प्रणाली राबविणे गरजेचे आहे. विविध विद्याशाखा, परस्पर आदान-प्रदान सुरू करून संशोधन कौशल्य विकास व स्वयंरोजगार या बाबतची स्वयं भावना जोपासण्याची गरज आहे. संशोधनाचा पाया हा सामाजिक दृष्टीकोनातून आपल्यात यावा, जेणेकरून, संशोधनाचा उपयोग हा देेश विकासात केेला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिक्षण-प्रशिक्षण वर्ग चालविणे आवश्यक

विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षम बनविण्या सोबतच त्यांचे चारित्र्य घडवून त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनविण्यात यावे, अशी व्यवस्था या नव्या शिक्षण प्रणालीने निर्माण व्हावी याकरीता शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण, तंत्र सुयोग्य वापर व जीवनावश्यक कौशल्य विद्यार्थ्यांना देण्यासोबतच शिक्षण-प्रशिक्षण वर्ग मोठया प्रमाणात चालविणे गरजेचे आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्याकरीता सर्व घटकांनां समजावून घेणे गरजेचे आहे. प्रथम सत्राचे संचालन डाॅ. सुधिर कोहचाळे यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ.कविता हेडा यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT