ration distribute esakal
अकोला

Akola News : गहू वाटपाला ब्रेक! सणांमध्ये गरिबांच्या ताटात भाकरी; रेशन कार्डधारकांना केले ज्वारीचे वाटप

अकोला जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यात गव्हा ऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे.

सुगत खाडे

अकोला - जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यात गव्हा ऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा व दिवाळी सारख्या सण, उत्सवाच्या काळात गरिब लाभार्थ्यांच्या ताटातून पोळी गायब होणार असून ज्वारीच्या भाकरीवरच आनंद साजरा करावा लागणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातील हजारो गोरगरीबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लाेकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहेत.

त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येत होते. परंतु सध्या लाभार्थ्यांना शासन आदेशानुसार मोफतच धान्याचे वाटप करण्यात येत आहे. अनेक लाभार्थी कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. या धान्य वाटपाचे प्रमाण शासनाने निश्चित केले आहे.

रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना ज्वारी खरेदी केल्यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना रेशनच्या दुकानातून सणासुदीच्या काळात गव्हा ऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी निखील खेमनार यांनी दिले आहेत.

पुरवठा विभागाने मंजूर केलेले नियतन

शहरी भागातील प्राधान्य गटातील तीन लाख ३८ हजार ६६६ लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाने तीन हजार ३७१.४२ क्विंटल ज्वारीचे तर १३ हजार ४६८.४४ क्विंटल तांदुळाचे नियमत मंजूर केले आहे. शहरी भागातील प्राधान्य गटातील सात हजार ८६ कार्डधारकांसाठी ७०८.३० क्विंटल ज्वारी तर एक हजार ७६९ क्विंटल तांदुळाचे नियतन मंजूर केले आहे.

ग्रामीण भागातील सात लाख ७६ हजार ४१९ प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना सात हजार ८६८.५८ क्विंटल ज्वारी व ३१ हजार ४७१.५६ क्विंटल तांदुळाचे व ३८ हजार ४९२ अंत्योदय लाभार्थ्यांसाठी तीन हजार ८५१.७० क्विंटल ज्वारी व नऊ हजार ६२१ क्विंटल तांदुळाचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: मुंबईत बेस्ट बसने दोघांना चिरडले, घटनेने खळबळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT