

Summary
रोहिणीने तेजस्वी यादव आणि त्यांच्या टीमवर वागणुकीबाबत गंभीर आरोप केले.
किडनी दान करताना पती आणि सासरच्या लोकांशी सल्लामसलत केली नाही याचा तिला आता पश्चात्ताप होत आहे.
राजदमध्ये नेतृत्व कोण घेणार यावरूनच कुटुंबातील मतभेद वाढले असून तेजस्वीवर टीका होत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राजदच्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला. लालू प्रसाद यांना किडनी दिलेली मुलगी रोहिणी आचार्य हिने कुटुंब आणि पक्षही सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या इतर तीन बहिणी, रागिणी, चंदा आणि राजलक्ष्मी यांनीही त्यांच्या लालू प्रसाद यांचे घर सोडले आहे.