मोहेगावनजीक ट्रक व एसटी बसचा अपघात; प्रवासी जखमी 
अकोला

मोहेगावनजीक ट्रक व एसटी बसचा अपघात; प्रवासी जखमी

ट्रक व एसटी बसचा अपघात झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोहेगावनजीक रविवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : ट्रक व एसटी बसचा अपघात झाल्याची घटना बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोहेगावनजीक रविवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य हलविण्यात आल्याची माहीती आहे.

सविस्तर असे की, एसटी बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. ४७५७ ही गाडी प्रवासी घेऊन सोनाळा येथून बुलडाणा जात होती. दरम्यान, रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोहेगाव फाट्यानजीक समोरून भरधाव येणाऱ्या ट्रक व एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले.

अपघात घडल्यावर ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. तर, एसटी बसचा बाजूचा पत्रा चिरल्या गेला. नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य करून जखमींना गाडीतून बाहेर काढले. वृत्त लिहिपर्यंत सात जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT