प्रचार sakal
अकोला

प्रचाराची रणधुमाळी आज संपणार

जि.प.च्या हातरुण सर्कलसह ग्रा.पं.च्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक

सकाळ वृत्तसेवा

अकोला - जिल्हा परिषदेच्या हातरुण सर्कलसाठी सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी (ता. २) संपेल. या सर्कलसाठी रविवारी (ता. ५) मतदान होणार असून १७ हजार १७८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. याव्यतिरिक्त ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सहा जागांसाठी सुद्धा ५ जून रोजीच मतदान होणार आहे. त्यानंतर सोमवारी (ता. ६) मतमोजणी करण्यात येईल.

शिवसेनेच्या हातरूण सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या सुनिता सुरेश गाेरे यांना विभागीय आयुक्तांनी पुन्हा अपात्र घाेषित केल्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयाेगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला हाेता. या सर्कलसाठी निवडणूक जाहीर झाल्याने संख्याबळ कायम ठेवण्याचे आव्हान शिवसेनेसमाेर उभे आहे, तर दुसरीकडे एक सदस्य वाढविण्याची संधी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला आहे. त्यामुळे सदर पोटनिवडणूक अतिशय चुरशीची आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत होणार आहे, तर एकमात्र अपक्ष सदस्य सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो त्यावर सत्ता समीकरण अवलंबून असल्याने ही निवडणूक सत्ताधारी वंचित व विरोधातील इतर पक्षांसाठी अतिशय महत्वाची आहे.

या ग्रामपंचायतींमध्येही संपणार प्रचार

मूर्तिजापूर तालुक्यातील मधापूरी येथील प्रभाग क्रमांक दोन, सोनाळा येथील प्रभाग क्रमांक तीन, अकोला तालुक्यातील अन्वी येथील प्रभाग क्रमांक एक, सांगवी मोहाडी येथील प्रभाग क्रमांक तीन. बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील प्रभाग क्रमांक तीन, गायगाव येथील प्रभाग क्रमांक चार या ग्रामपंचायतींच्या प्रभागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT