अकोला

पोटनिवडणुक; शिवसेनेचा स्वबळाचा नारा, काँग्रेसचे धोरण गुलदस्त्यातच

सकाळ वृत्तसेवा

वाशीम ः जिल्हा परिषदेतील रिक्त झालेल्या १४ जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या १४ जागांवर उमेदवार उभे करताना जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन महाविकास आघाडीचे असून, पोटनिवडणुकीत मात्र महाविकास आघाडीची शक्यता धुसर झाली आहे. आघाडीबाबत काँग्रेसने अजून, धोरण ठरविलेच नसून शिवसेनेने मात्र स्वबळाचाच नारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चांगलीच रंगत पाहवयास मिळणार आहे. (By-elections; Shiv Sena's slogan of self-reliance, Congress's policy in the bouquet)


वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नियोजित आरक्षणापेक्षा अधिक आरक्षण घोषित करण्यात आले होते, मात्र घोषित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे आरक्षण अधिक होते. त्यामुळे या आरक्षणावर उच्च न्यायालयात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. यावर सुनावनी होवून उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या जुन्याच कार्यकारीणीला मुदतवाढ दिली होती.

यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरक्षणा संदर्भातील सर्व याचिका दाखल करून घेत, न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले होते. आयोगाने यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या होत्या. दरम्यान, या याचिकेवरील सुनावनी सुरुच होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मागास प्रवर्गातील जागावरील निवडणुका रद्द ठरविल्या होत्या. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढील दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश दिले होते. आता निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेमधील एकूण ५२ जागा पैकी १४ जागांवर निवडणूक होत आहे. काटा, पार्डी टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, भामदेवी, कुपटा, फुलउमरी, आसेगाव, तळप या गटांचा समावेश आहे. रद्द झालेल्या जागांमधे होणारी निवडणूक सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



जिल्हा परिषदेतील रिक्त १४ जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना सर्वच जागा स्वबळावर लढणार आहे. आघाडीबाबत अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याने शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे.
-सुरेश मापारी, जिल्हाप्रमुख, शिवसेना.



जिल्हा परिषदेतील १४ रिक्त जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, मात्र महाविकास आघाडीबाबत अजून, कोणताही निर्णय झाला नाही, तसा प्रस्तावही आला नाही. यावर अजून पक्षपातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
-ॲड. दिलीपराव सरनाईक, जिल्हाध्यक्ष, वाशीम.



जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीबाबत वरिष्ठांशी अजून, चर्चा झाली नाही. कोविडमुळे निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी सरकारची भूमिका आहे. त्याअनुशंगाने निवडणूक आयोगाकडे मुख्य सचिवांनी पत्रव्यवहार केला आहे. तरीही वेळेवर निर्णय घेण्यात येईल.
-चंद्रकांत ठाकरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

संपादन - विवेक मेतकर

By-elections; Shiv Sena's slogan of self-reliance, Congress's policy in the bouquet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT