लॉकडाउन
लॉकडाउन ई सकाळ
अकोला

लॉकडाउनमध्ये दुकान उघडलं की कारवाई झाली म्हणून समजा

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना (Corona Virus) संकट काळातील लॉकडाउनदरम्यान (Lockdown in akola) जिल्हा व मनपा प्रशासनाने (Akola muncipal corporation) जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील सात व्यावसायिक प्रतिष्ठानांना सिल करण्यात आले आहे. याशिवाय पाच दुकानावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. (Corona Lockdown fines professionals for violating the rules)

मनपा व पोलिस प्रशासनातर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. ज्‍यामध्‍ये मोहम्‍मद अली रोडवरील बी.के.प्‍लाय, फैजल क्‍लॉथ सेंटर, गांधी रोड स्थित आझाद कॉम्‍प्‍लेक्‍स येथील झूम कलेक्‍शन, जवाहर नगर येथील ॲपल कलेक्‍शन, गॅलेक्‍सी कलेक्‍शन, वाय फाय कलेक्‍शन, कवच आर्केट येथील आर्यन मोबाईल या दुकानांवर सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

टिळक रोडवरील शिव मार्केटींग, रूपेश जनरल स्‍टोर्स, मालानी ब्रदर्स, गोविंद ट्रेडर्स, एम.जे.मार्केटींग यांच्‍यावर प्रत्‍येकी तीन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्‍यात आली आहे. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, जीवन मानकीकर, करण ठाकूर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, योगेश कंचनपुरे, जय गेडाम, संतोष भगत, मो.सलीम, पवन चव्‍हाण आदिंचा समावेष होता.

संपादन - विवेक मेतकर

Corona Lockdown fines professionals for violating the rules

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT