कोरोना पसरला ‘नमस्ते ट्रम्प-नमस्ते स्टंप’मुळे! ; ढोणे
कोरोना पसरला ‘नमस्ते ट्रम्प-नमस्ते स्टंप’मुळे! ; ढोणे sakal
अकोला

अकोला : कोरोना पसरला ‘नमस्ते ट्रम्प-नमस्ते स्टंप’मुळे! ; ढोणे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसने पलटवार करीत, भारतात कोरोनाचा उदय नरेंद्र मोदींच्या ''नमस्ते ट्रम्प'' व जय शाह यांच्या ''नमस्ते स्टंप '' या दोन कार्यक्रमामुळेच झाला असल्याचे म्हटले आहे. देशात कोरोना पसरण्यास नरेंद्र मोदी, जय शाह व तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कंमिटीचे प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे यांनी केला आहे.

ता. १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी देशात कोरोना येण्याची भीती व्यक्त करीत, त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र, ता. १९ फेब्रुवारी २०२० रोजी मोदींनी त्याबाबत एक शब्दही न बोलता चवदार लिट्टी चोखाचे जेवण केले व गरम चहा घेतल्याचे सोशल मीडियावर लिहून कोरोनाबाबत अजिबात गंभीर नसल्याचे मोदींनी दाखवून दिले होते. ता. ५ मार्च २०२० रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला उत्तर देतांना असे ट्विट केले होते की, गांधी परिवार देशाला कोरोनाची भीती दाखवित्त आहे. देशात कोरोनाची अजिबात भीती नसून, राहुल गांधी यांना जागतिक आरोग्य संघटनेपेक्षाही अधीक ज्ञान असल्याची उपरोधिक टीका केली होती. यावरून पंतप्रधान मोदी, देशाचे आरोग्य मंत्री कोरोना बाबत किती बेफिकीर व बेजबाबदार होते हे सिद्ध होत असल्याचा आरोपही डॉ.सुधीर ढोणे यांनी केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या व नंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतःचे नाव दिलेल्या अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमवर अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांनी ‘नमस्ते स्टंप’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली होती. गुजरातच्या उच्च न्यायालयाने ता. १२ एप्रिल २०२० रोजी गुजरात सरकारवर यासंदर्भात टीकाही केली होती. यावरून देशात कोरोना पसरविण्यात नरेंद्र मोदींच्या ‘नमस्ते ट्रम्प’ व जय शाह यांच्या ‘नमस्ते स्टंप’ तसेच तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ . हर्षवर्धन यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

नरेंद्र मोदींच्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळेच कोरोनाची पहिली लाट

राहुल गांधी यांनी ता. १२ फेब्रुवारी २०२० रोजी देशात कोरोना येण्याची भीती व्यक्त केली असताना पंतप्रधान मोदींनी त्यानंतरही ता. २४ व २५ फेब्रुवारी २०२० रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतरच देशात कोरोनाची पहिली लहर आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT