Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Virat Kohli - Suresh Raina: भारतीय संघातील निवडीसाठी रैनाचीही कशी मदत झालेली, याबाबत विराट कोहलीने खुलासा केला आहे.
Virat Kohli - Suresh Raina
Virat Kohli - Suresh RainaSakal

Virat Kohli - Suresh Raina: क्रिकेटमधील सध्या गाजणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे विराट कोहली. गेल्या जवळपास 15 वर्षांत विराटने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले आहेत. तो आता दिग्गज खेळाडूंमध्येही गणला जातो.

दरम्यान, विराटच्या या यशामागे त्याचे कष्ट मेहनत, तर आहेच, पण त्याला भारतीय संघात आणण्यापर्यंत अनेकांनी योगदान दिले आहे. भारताचा माजी कर्णधार सुरेश रैनाचेही यात योगदान राहिले आहे. त्याचमुळे विराटनेही रैनाचे आभार मानले आहेत. विराटने जिओ सिनेमाशी बोलताना रैनाच्या मदतीबद्दल खुलासा केला आहे.

विराटने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एमर्जिंग प्लेअर्स टूर्नांमेंटच्या वेळची आठवण सांगताना याबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी प्रवीण आमरे प्रशिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला विराटला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले नव्हते. पण रैनाने जेव्हा त्याला नेट्समध्ये सराव करताना पाहिले, तेव्हा त्याने त्याच्या नावाची शिफारस केली होती.

Virat Kohli - Suresh Raina
Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

विराट म्हणाला, 'मला वाटते 2008 साली. भारताचा सामना होता. आम्ही एमर्जिंग प्लेअर्स स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये खेळत होतो. एमर्जिंग प्लेअर्स स्पर्धेचा हेतू असा होता की जे चांगले खेळाडू देशासाठी खेळण्याच्या उंबरठ्यावर आहेत, ते त्याच खेळतील. त्यामुळे ती स्पर्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती.'

'मला अजूनही आठवतं रैनाने कदाचीत माझ्याबद्दल ऐकलं होतं. तो स्पर्धा चालू झाल्यानंतर संघात सामील झाला होता. आधी एस बद्रिनाथ कर्णधार होता, त्यानंत रैना आला आणि त्याने नेतृत्व केलेलं. प्रवीण आमरे प्रशिक्षक होते आणि त्यांनी मला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं होतं.'

Virat Kohli - Suresh Raina
Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

विराटने पुढे सांगितलं, 'रैनाने मला नेट्समध्ये खेळताना पाहिलं आणि त्याने आमरे सरांना विचारलं की मला का खेळवत नाहीये. मी तेव्हा मधल्या फळीत फलंदाजी करायचो, तेव्हा अजिंक्य रहाणे सलामीला फलंदाजी करायचा. आमरे सरांनी सांगितलं की संघात जागा नाहीये. पण रैनाने मी खेळावे यासाठी पुढाकार घेतला.'

'तेव्हा आमरे सरांनी मला बोलावलं आणि विचारलं की सलामीला फलंदाजी करणार का? मी म्हणालो मी कुठेही फलंदाजी करेल, फक्त मला खेळण्याची संधी द्या. तेव्हा मी न्यूझीलंडविरुद्ध सलामीला फलंदाजी केलेली. दिलीप वेंगसरकर सर त्यावेळी निवड समितीमध्ये होते. मी नाबाद 120 धावा केल्या आणि कदाचीत तेव्हा त्यांनी ठरवले की मला पुढे संधी देतील.'

विराट म्हणाला, यासाठी तो रैनाचे आभार मानतो की त्याने त्याचं नाव सुचवलं होतं.

दरम्यान, विराटने ऑगस्ट 2008 मध्ये भारतीय संघाकडून डंबुला येथे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. तेव्हापासून विराट भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. त्याने नंतर त्याच्या कारकि‍र्दीत 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळताना २५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 80 शतके देखील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com