Covid center has been re launched in Sindkhed Raja city.jpg 
अकोला

सिंदखेड राजा शहरात कोविड सेंटर पुन्हा सुरू

गजानन काळुसे

सिंदखेडराजा (बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी व तहसीलदार सुनील सावंत यांनी पुढाकार घेवून सिंदखेडराजा शहरांतील सहकार विद्या मंदिर याठिकाणी कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

सध्या कोविड सेंटरमध्ये १२ रुग्ण आहेत. त्यांचे ४ डॉक्टर व  १० कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री नागरिकांनी पाळण्याची आवाहन तहसीलदार तथा दंडाधिकारी सुनील सावंत याची केले आहे.

तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्यानंतर निर्माण केलेले कोविड सेंटर बंद होती. मात्र आता दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. सध्या लॉकडाउन व संचारबंदी असून सुद्धा नागरिक मास्क व सोशल डिस्टंसिंग भान ठेवत नसल्यामुळे तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरीकांमध्ये मास्क वापरणे, हात धुणे व सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री अवलंब करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्यावर कारवाई येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तालुक्यामध्ये कोरोना बधितांची संख्या कमी आहे. नियमांचे उल्लंघन करणे, विना मास्क फिरणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे अशा बाबीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या गोष्टीचे पालन केले नाही तर कडक संचारबंदी व लॉकडाउनशिवाय प्रशासन समोर पर्याय राहणार नाही. त्यामुळे कोरोना संबंधिचे पालन करणे आवश्यक आहे.

प्रशासनाची जबाबदारी वाढली 

विना मास्क फिरणाऱ्याकडून सक्तीने दंड वसुली, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यावर कारवाई , कोरोना सेंटर, औषधींचा नियमित आढावा, कॉन्टॅक्ट ड्रेसिंग, कोरोना टेस्टिंगची संख्या वाढवणे, लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे, बस स्थानक, गर्दी परिसरात जनजागृती व सूचना देण्याचे काम महसूल, आरोग्य, पोलीस, पंचायत प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मास्क फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांनी सतर्कता बाळगायला हवी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक वेळी बाहेर फिरू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करावे त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
- सुनील सावंत, तहसीलदार सिंदखेड राजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT