akola sakal
अकोला

आठवडाभरात मिळणार पिक विम्याची रक्कम

आ. डॉ. संजय कुटे यांच्‍या लढ्याला यश : विमा कंपनीला घ्यावी लागली निर्णायक भूमिका

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पिकविम्‍या संदर्भात जळगाव जामोद उपविभागाबाबत साततत्‍याने पाठपुरावा करुन शासनदरबारी समस्‍या मांडल्‍याने आमदार डॉ. संजय कुटे यांच्‍या प्रयत्‍नांना यश आले असून पिक विमा कंपनीला निर्णायक भूमिका घ्यावी लागली असून, येत्‍या आठवडाभरात शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात पीक विम्‍याची रक्‍कम जमा होणार आहे.

पिकविमा प्रलंबीत प्रश्नाबाबत गेल्या ७-८ महिन्यांपासून जळगाव जामोद मतदारसंघातील पीक विम्याचा प्रश्न घेऊन सतत राज्य शासन आणि पीकविमा कंपनीकडे आ.डॉ.संजय कुटे यांी पाठपुरावा व आंदोलन केले. याचाच भाग म्हणून १६ सप्टेंबरमध्ये मंत्रालय येथे आंदोलन केले असता त्यावेळी शासनाकडून १५ दिवसाचा वेळ मागण्यात आला होता. याबाबत बैठकीचे आयोजन १५ दिवसात करण्यात येईल अशी ग्‍वाही देखील राज्‍य शासनाकडून देण्यात आली होती त्या नुसार ५ ऑक्‍टोबर रोजी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात पीकविमा कंपनीचे अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी यांचे सोबत या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या बैठकीत सुद्धा पीकविमा कंपनीने आपली असमर्थताच दर्शवली होती. परंतु, कडक पवित्रा घेताच कृषिमंत्र्यांनी आणि जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी समर्थन दिले आणि ते सुद्धा बैठकीत शेवट पर्यंत उपस्थित राहून हीच भूमिका मांडत होते. अखेर पीकविमा कंपनीच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चेनंतर अाठ दिवसात प्रलंबित असलेली पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल असा शब्द दिला असून, गेल्या अनेक दिवसांपासून देत असलेल्‍या लढ्याला यश येणार आहे.

आता खऱ्या अर्थाने पिक विमा मंजूर झाल्याबद्दल मतदारसंघात आनंद व्यक्त केल्या जात असून, प्रश्न श्रेयाचा नसून शेतकऱ्यांचे अडचणीच्या दिवसात काम मार्गी लागणे याचा आहे. या मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी वारंवार निवेदने आंदोलने करून शासनाला पिक विमा मंजूर करण्यास भाग पाडले. त्यामुळे मतदार संघातील भूमिपुत्रांच्या वतीने तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते श्रीराम उर्फ बंडू भाऊ पाटील यांनी आमदार डॉ. संजय कुटे यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT