crop loan esakal
अकोला

Crop Loan Distribution : शेतकऱ्यांना २४४ कोटी पीक कर्जाचे वितरण; १६ टक्के उद्दिष्टपूर्ती

खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचे जिल्ह्यात संथ गतीने वाटप सुरू आहे. चालु खरीप हंगामासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा - खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचे जिल्ह्यात संथ गतीने वाटप सुरू आहे. चालु खरीप हंगामासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत २३ हजार शेतकऱ्यांना २४४ कोटी वितरीत झाले आहेत. एकूण उद्दिष्टाच्या केवळ १६ टक्के ही उद्दिष्ट पुर्ती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

मान्सूनच्या तोंडावर आता शेतकऱ्यांची पीक कर्जासाठीची लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बँकांनी पीककर्ज वाटपाला प्राधान्य देत कर्जवाटपाची गती वाढविण्याची गरज आहे. वार्षिक पतआराखड्यानुसार चालू आर्थिक वर्षात खरीप हंगामासाठी १ लाख ५३ हजार ५०० शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.

पैकी २४ मेपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी २२,९९५ शेतकऱ्यांना २४४ कोटी ८९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. एकूण उद्दिष्टाच्या १६ टक्क्यांपर्यंत हे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. खासगी बँकांना ७,६०० शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्यापैकी या बँकांनी २४ मेपर्यंत ७८५ शेतकऱ्यांना ९ कोटी ६२ लाख २८ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील बँकांनी आतापर्यंत वाटप केलेल्या पीककर्जाचा टक्का पाहता खासगी बँकांकडून सर्वात कमी पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

कर्जाला शून्य टक्के व्याज

शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण करून केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नुतनीकरण केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज लागते. तसेच १० टक्के वाढीव कर्ज मिळत असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा.

पीक कर्ज नुतनीकरणामुळे खरीप पिकासाठी लागणाऱ्या खर्चास मदत होते. पीक कर्जाच्या नुतनीकरणासाठी प्रत्येक बँक शाखेमध्ये विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. पीक कर्जाचे नुतनीकरण शेतकऱ्यांना फाय‌द्याचे असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज नुतनीकरण करावे,

- डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलडाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT