अकोला

राग अनावर : जावयाने सासूला ढकलले विहिरीत; बुडून मृत्यू

जावयी व मृत महिलेची मुलगी यांच्यात वाद होत असल्याने सासूने मध्यस्थी केली

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : घरगुती भांडणात (Domestic dispute) बोलण्याचा राग धरत जावयाने सासूला विहिरीत फेकल्याने (pushed her mother-in-law into well) मृत्यू झाला. मुलगा ज्ञानेश्वर डाखोरे (२३, रा. अंधार, सांगवी, ता. पातूर) याने बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. चंद्रकलाबाई डाखोरे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विलास मारोती इंगळे (रा. दुर्गपुर ता. मेहकर) असे आरोपी जावयाचे नाव आहे.

ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी शेतमालक शेतात आले असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत बाळापूर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद घुईकर, पोलिस उपनिरीक्षक गजानन रहाटे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील (Drowning) मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी घटनास्थळावरून फरार

सोमवारी रात्री ही घटना घडल्यानंतर विलास इंगळे हा घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्या मागावर बाळापूर पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

घरगुती वादातून (Domestic dispute) खुनाची घटना घडली आहे. घटनेतील मारेकरी जावयी व मृत महिलेची मुलगी यांच्यात वाद होत असल्याने सासूने मध्यस्थी केली. यातूनच ही घटना घडली आहे. पोलिस आरोपी जावयाचा शोध घेत आहे.
- भाऊराव घुगे, ठाणेदार, पोलिस स्टेशन, बाळापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT