power supply not stable  Sakal
अकोला

Akola News : तीन दिवसांनंतरही वीजपुरवठा सुरळीत नाही; नागरिकांना सेवा देण्यात महावितरण अपयशी

वीज हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वीजेशिवाय आपल्या दैनंदिन वाटचालीला जणू ब्रेकच लागतो.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शहरातील अनेक ठिकाणच्या तारा तुटल्याने विज पुरवठा खंडीत झाला आहे. तर काही ठिकाणी ट्राॅन्सफाॅर्मर सुद्धा नादुरुस्त झाले आहेत. ७२ तास उलटले तरी महावितरण प्रशासन अद्यापही वीज पुरवठा सुरळीत करू शकले नसल्याची वस्तूस्थिती आहे. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

वीज हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वीजेशिवाय आपल्या दैनंदिन वाटचालीला जणू ब्रेकच लागतो. अकोला शहरात दीड लाखाच्या जवळपास ग्राहक आहेत. या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

दिवसा ५० तर रात्रीच्या वेळी केवळ २० लाईनमन कार्यरत असतात. त्यामुळे आणखी किती दिवस हे काम चालेल हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच माहित अशाप्रकारची टिकाही आता ग्राहकांमधून होत आहे.

अकोला शहरातील ३० टक्के भागात अजूनही वीज पुरवठा सुरु करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. हेल्पलाईनवर फोन करून काम सुरु असल्याचे सांगितल्या जाते. परिणामी रात्रीच्या वेळी नागरिकांना असाह्य उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या दुरूस्ती वाहनावरील कर्मचारी फोन उचलत नसल्याची ओरड होत आहे.

शॉर्ट सर्किटचे प्रमाण वाढले

मागील आठवडाभरात वीजेचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने विद्यूत उपकरणे जळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक भागात वीजवाहिन्यांना शॉर्ट सर्किट होवून नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मिनी फीडर नादुरूस्त झाले आहेत. केबल दुरुस्तीच्या कामासाठी लवकर काम होत नाही. दुरूस्तीची कामे रखडली आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण याच्या तुलनेत वीज पुरवठा करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या वादळाने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. लवकरच शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा सुरळीत होईल.

- जयंत पैकीने, कार्यकारी अभियंता, शहर विभाग अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT