अकोला

सांगा मी परीक्षा देऊ कुठे? प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा पत्ताच नाही

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : आरोग्य विभागातर्फे विविध संवर्गासाठी रविवार ता. 26 सप्टेंबर रोजी परीक्षा (Health department exam) घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (telhara akola) तालुक्यातील तळेगाव बाजार येथील एका परीक्षार्थी उमेदवाराला पाठविलेल्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचे नाव दिले, ते परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे व कोणत्या भागात आहे, याचा पत्ताच दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने आरोग्य विभागाला मी परीक्षा कुठे देऊ, असा प्रश्न विचारला आहे.

आरोग्य विभागातर्फे 'ड' वर्ग संवर्गातील विविध पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र पाठविण्यात आले आहे. प्रवेश पत्र पाठविताना विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्राची माहिती व त्या परीक्षा केंद्राचा पत्ता नमूद केलेला असतो. मात्र, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका येणाऱ्या तळेगाव बाजार येथील स्वप्निल संजय ढोले या विद्यार्थ्याला पाठविण्यात आलेल्या प्रवेश पत्रावर केवळ परीक्षा केंद्राचे नाव नमूद केले आहे. हे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे याची माहितीच प्रवेश पत्रावर देण्यात आली नाही. केवळ पिनकोड नंबर टाकला असल्यामुळे हे परीक्षा केंद्र नागपूर शहरातील असल्याची माहिती विद्यार्थ्याला झाली. मात्र, नागपूर शहरातील कोणत्या परिसरात हे परीक्षा केंद्र आहे याची माहिती नसल्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडला आहे. या विद्यार्थ्याला मिळालेल्या प्रवेश पत्रावर श्रीमती विमला डॉ. लक्ष्मीनारायण सोनी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, हिवरी लेआउट नियर केडियम गर्ल्स कॉलेज एवढाच पत्ता देण्यात आला आहे. हे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे, याचा पत्ता प्रवेश पत्रावर नमूद पिनकोड वरुनच झाला. हे परीक्षा केंद्र नागपूर शहरातील असल्याची माहिती विद्यार्थ्याला पिनकोड वरून झाली असली तरी नागपूर शहरातील कोणत्या परिसरात हे परीक्षा केंद्र आहे याची माहिती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मात्र चांगलीच धावपळ होताना दिसत आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनांची परीक्षा घेताना आरोग्य विभागाने डोळेझाक करुन प्रवेश पत्र पाठवल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संभ्रमात पडले आहेत. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभार बाबत परीक्षार्थी उमेदवारांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT