ई-पीक  Sakal
अकोला

अकोला : ई-पीक पेरा नोंदणीची कामे शेतकऱ्यांकडे नको

भारत कृषक समाजाची महसूल व कृषीमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ई-पीक पेरा नोंदणीची कामे शेतकऱ्यांकडे नको तर, ही कामे शासकीय कर्मचाऱ्यांकडून किंवा बेरोजगार तरूणांना मानधन देऊन त्यांच्याकडून करून घ्यावीत, अशी मागणी भारत कृषक समाजाचाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी शासनाकडे केली आहे.

ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र शासनाने खासकरून महसूल व कृषी खात्याकडून ‘माझी शेती माझा सातबारा माझा पीक पेरा’ या घोषवाख्याचे आधारे ई-पीक पाहणी नोंदणी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकाची नोंदणी आपापल्या सातबारामध्ये करावी, असे आदेश काढले होते. शेतकऱ्यांनी पीक पेऱ्याची नोंद केल्यावर ती खरी की खोटी, ही पाहणी महसूल विभागाने करावी, असे आदेशात म्हटले होते. परंतु, शेतकऱ्यांनीच त्यांच्या मोबाईलमध्ये शेताचे फोटो काढून पीक नोंदीची माहिती त्या सरकारी ॲपमध्ये भरावी हा अट्टहास कशासाठी? गेली अनेक वर्ष म्हणजे, सुरुवातीपासूनच ही कामे महसूल व कृषी विभागाकडून केली जात आहेत.

मग आताच हे शासकीय काम शेतकऱ्यांनी का करावे? ६० टक्क्यांच्यावर शेतकऱ्यांकडे आधुनिक मोबाईल नाही, नेट नाही, अनेक शेतामध्ये नेटवर्क नसते, या बाबतीत शेतकऱ्यांकडे पुरेसे ज्ञान नसते, तरीही ही कामे शेतकऱ्यांनेच करावी, अशी आग्रहाची भूमिका शासनाकडून का घेतल्या जात आहे?

शेतकऱ्यांनी या मोहिमेत पुरेसा भाग न घेतल्यामुळे शासनाला वारंवार मुदतवाढीची घोषणा करावी लागत आहे. ही पीक पेरा नोंदणी मोहित चांगली आहे परंतु, हे शासकीय काम शासकीय कर्मचाऱ्यांनीच करावे, कर्मचारी कमी पडत असतील तर, बेरोजगार तरूण मुले-मुली भरपूर आहेत. त्यांना थोडे मानधन देऊन ही कामे सांगा. अशी मागणी निवेदनाद्वारे भारत कृषक समाज महाराष्ट्राचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी महसूल व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT