अकोला

मोहात पडून गमाविले ५६ लाख; फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील लहरियानगर परिसरातील एका सेवानिवृत्त नागरिकाला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची मागणी करीत ५६ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नायजेरियन नागरिकाला अकोला सायबर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. हरिसन इंगोला (३५ रा. डेल्टा सिटी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहात पडून ५६ लाख गमाविण्याची वेळ आलेले आत्माराम रामभाऊ शिंदे यांनी खदान पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मोहात अडकविले. ड्युटी ऑफिसर असल्याचे सांगून मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. या माध्यमातून भारतातील काही नागरिकांच्या मदतीने बोलून पाठवण्यात आलेल्या पार्सलच्या अनुषंगाने काही रक्कम भरण्याचे सांगण्यात आले. यामध्ये त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ५६ लाख रुपये उकळण्यात आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट खदान पोलिस स्टेशन गाठून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा रॅपगस्ट सुजी, रिधी गुप्ता (रा. आनंदापूर कोलकाता), आशिष कुमार (कॅनरा बँक नवी दिल्ली), नसीमुद्दीन (रा. राजाजी नगर बेंगरूळ), सिबानू कायपेंग (रा. पेरांबूर केरळ), इम्रान हुसेन (रा. बेंगरूळ), सोबीनोय चकमा (रा. जमना नगर गुजरात), रमलज्योती चकमा (रा. एमजी रोड बेंगरूळ), अशोक (रा. दिल्ली), अँथनी (रा. सिरिया) या १० आरोपी विरोधात तक्रार दिली. या फिर्यादीवरून खदान पोलिसांनी ता. ४ जुलै २०२१ रोजी आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. या तपासादरम्यान सायबर पोलिसांच्या मदतीने व तांत्रिक मदतीने पोलिसांनी मुंबई येथून हरिसन इंगोला या नायजेरियन आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT