akola sakal
अकोला

Ganeshotsav : ४८९ कुटुंबांतील गणेशभक्तांनी साकारले ‘इकोफ्रेंडली’ बाप्पा

गणेश मूर्ती कार्यशाळा; गाडगेबाबा सेवा समिती व तीक्ष्णगतचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

अकोला - यावर्षीचा गणेशोत्सव अकोला शहरात घरोघरी पर्यावरणपूरक साजरा केल्या जावा, यासाठी संत गाडगेबाबा सेवा समिती व तीक्ष्णगत संस्थेच्या वतीने शहरात शाडू मातीपासून गणेश मूर्ती निर्मितीची कार्यशाळा गुरुवार दि.१४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ४८९ कुटुंबांतील गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्या. गुरुवारी आदर्श कॉलनी परिसरातील खंडेलवाल लॉन्स येथे गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली.

गणेशभक्तांनी उत्कृष्ट गणेश मूर्ती साकाराव्यात यासाठी प्रशिक्षक म्हणून पर्यावरण प्रेमी शरद कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. गणेश मूर्ती निर्मितीला लागणारे संपूर्ण साहित्य आयोजकांच्या वतीने निःशुल्क पुरवण्यात आले होते. ‘चला घडवू शाडू मातीचा गणपती’ या उपक्रमांतर्गत संत गाडगेबाबा सेवा समिती गोरक्षण रोड, अकोलाच्या पर्यावरणपूरक गणेश निर्मिती कार्यशाळा यशस्वीतेसाठी संत गाडगेबाबा सेवा समितीचे निशिकांत

बडगे, गजानन गनोजे, रुपेश कामले, तुलसीदास खिरोडकार, नंदकिशोर चीपडे, नितीन राऊत, गजानन चव्हाण, मनोज खत्री, शशिकांत सुरवाडे, सोनु कावळे, कुलदीपसिंह अंधरेले, जया भारती, आशिष कसले, मनीष मुराई, मुन्ना पिंपळे, दीपक तायडे, संजय वाघमारे पांडव यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT