Akola Crime News sakal
अकोला

Akola Crime: अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार,आरोपींमध्ये एका युवतीचा समावेश

Akola Sexual Abuse on Minor Girl News: अकोल्यातील एका पंधरा वर्षीय मुलीवर वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका युवतीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola Crime News Updates in Marathi : जुने शहरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली बिअर देत तीन युवकांनी सामूहिक अत्याचार केला. तसेच या अत्याचाराचा व्हिडिओ व फोटो काढून तिला ‘ब्लॅकमेल’ केले.

याबाबत बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत या प्रकरणातील आरोपी युवतीला अटक केली आहे. या घटनेने शहरात व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जुने शहरात वास्तव्यास असलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलीशी ओळख वाढवून विवाहित असलेल्या लल्ला इंगळे नमक इसमाने तिच्याशी सलगी साधली. त्याने मित्र लल्ला इंगळे आणि बंटी सटवाले याच्याशी पीडितेची ओळख करून दिली.

नंतर बंटी सटवालेने तिची पायल घोराडेशी ओळख करून दिली. ९ सप्टेंबरला पीडित मुलीचा वाढदिवस होता. तो घरीच साजरा करू असे लल्ला इंगळेने तिला सांगितले. ती इंगळेच्या घरी गेले असता तिला त्याने मामी विमलाबाई यांच्याकडे नेले. रात्री बारानंतर लल्ला इंगळे व बंटी सटवाले यांनी दारू घेत तिला ‘सॉफ्ट ड्रिंक’ म्हणून बिअर पाजली. यानंतर लल्ला आणि बंटी यांनी अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

याचे व्हिडिओ आणि फोटो आपल्याजवळ असल्याचे सांगून लल्ला, बंटी आणि पायल यांनी आपल्याला ‘ब्लॅकमेल’ केल्याचेही या अल्पवयीन पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. सोबतच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. झालेला प्रकार तिने घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली.

या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम ६४(२)(सी), ६५,७०, ३५१(१), ३५१(२) बीएनएस प्रमाणे तसेच ४(२), ५(पी), ५(ग), ६,१२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक नितीन लेवसकर व त्यांच्या चमूने आरोपी युवती पायल घोराडेला गुरुवारी अटक केली. पोलिस उर्वरित तीन आरोपींच्या मागावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT