Crime News esakal
अकोला

Crime News : गावठी पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्याला पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची उरळ हद्दीत कारवाई

सकाळ डिजिटल टीम

अकोला : बाळापूर तालुक्यातील उरळ हद्दीत एक जण गावठी पिस्तूल व काडतूस बाळगून असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून पोलिसांनी पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत. उरळ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

रघुवीर तेलसिंग चौहाण (रा. फुकटपुरा, जलाराम मंदिर जवळ जळगाव जामोद) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, उरळ हद्दीत एका युवकाकडे पिस्तूल आहे. अशा माहितीवरून त्यांच्या पथकाने उरळ हद्दीतील कवठा येथून रघुवीर चौहाण याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व सहा काडतुसे दिसून आली.

पोलिसांनी ती जप्त करून त्याला अटक केली व उरळ पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात गोपाल जाधव यांचे पथकातील रविंद्र खंडारे, महेंद्र मलीये, अविनाश पाचपोर, गोकुळ चव्हाण, वसीम शेख, भीमराव दीपके, अक्षय बोबडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : 'विद्यार्थ्यांचे ऐका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या'; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT