Bul sakal
अकोला

Buldhana Crime : विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा

चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत ३६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी आज ११ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मोताळा : चारचाकी कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत ३६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी आज ११ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, पीडिता सासरी नांदत असताना पती नामदेव जगदेव वाकोडे, जगदेव सुखदेव वाकोडे, कुसुम जगदेव वाकोडे, प्रकाश जगदेव वाकोडे, प्रतिभा प्रकाश वाकोडे (सर्व रा. खरबडी) व मंगला कचरू दाभाडे, अजय कचरू दाभाडे (दोघे रा उन्नां ता. खामगाव) यांनी संगनमत करून चारचाकी कार घेण्यासाठी पीडितेला माहेरवरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच तिच्या पतीला इतर आरोपींनी चिथावणी दिली की, पीडितेला वागवू नको. तू दुसरे लग्न कर, असे सांगितले. सोबतच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार २३ मे २०१८ ते ७ मार्च २०२४ या कालावधीत खरबडी येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त सात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमोल खराडे, प्रमोद साळोक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT