

Mumbai CNG Price Hike
esakal
CNG Price Increase : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांचे आर्थिक गणित बिघडले असतानाच आता सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपये ५० पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो ९१ रुपये ५० पैसे झाला आहे. ही दरवाढ १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.