

Ishan Kishan | India vs New Zealand 5th ODI
Sakal
माऊंट मौंगानुई येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी (१५ नोव्हेंबर) खेळवला जात आहे. चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारतीय फलंदाजी कोलमडली, पण ईशान किशन आणि अक्षर पटेलने थोडी झुंज दिली.
शेवटी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्या मोठ्या फटक्यांमुळे भारताला न्यूझीलंडसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटेनर, जेकॉब डफी आणि मॅथ्यू फिशर यांनी भारताला मोठे धक्के दिले.